विदर्भ special तुरीच्या हिरव्या दाण्याचे झणझणीत लवट l तुरीच्या शेंगा l
Автор: Anjali's Home Diary
Загружено: 2025-11-20
Просмотров: 36
Описание:
नमस्कार
Anjali's home diary या आपल्या channel वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
आज या व्हिडिओ मध्ये मी हिवाळ्यात मिळणाऱ्या तुरीच्या शेंगांच्या दाण्याची भाजी अर्थात lavat ची भाजी कशी करायची ती सांगितली आहे. ही नागपूर मध्ये करण्यात येणारी पद्धत आहे.
या शेंगा आपल्या शरीरासाठी अगदी लाभदायक असतात. यात भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने असतात. हृदयासाठी चांगल्या असतात. आणि वजन देखील कमी करण्यास मदत करतात. तर या दाण्याची भाजी मी कशी करते ते यात मी दाखवत आहे.
तुरीच्या दाण्याचे रस्सा गोळे/ lavat
यासाठी pan मधे थोड तेल टाकून त्यात कांदा, लसूण, लाल मिरच्या, व मसाले (तेजपान, खोबरे, लवंग, मिरे, धणे) टाकून भाजून घ्यायचा व नंतर आलं टाकून थंड झाल्यावर थोड पाणी घालून मिक्सर मधे छान बारीक करून घ्याच.
नंतर त्याच pan मध्ये थोडं तेल घालून १०लसुण पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या व तुरीचे दाणे घालून २ ते ३मिनिट भाजून घ्याच यात थंड झाल्यावर आलं,कढीपत्ता, व कोथिंबीर घालून mixer मधून पाणी न घालता जाडसर वतन करून घ्यावे.
त्यानंतर त्याच pan मधे ३ पळी tel घालावे, जिरे मोहरी घालून बारीक केलेली paste घालून त्याला शिजवावी. त्यानंतर त्यात तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, मीठ घालावे. व जवळपास २ ग्लास पाणी घालून उकळून घ्यावे.
नंतर तुरीच्या वाटणात मीठ व थोड चणा डाळीचे पीठ घालून त्याला mix करून त्याचे गोळे तयार करावेत. हे गोळे उकळलेल्या रसात घालून त्याला चम्मच न फिरवता वाफवून घ्यावेत. ८ मिनिट हे गोळे यात शिजवून झाल्यावर त्यात गोडा मसाला व कोथिंबीर घालावी.
चवीला अगदीच मस्त व झणझणीत अशी भाजी तयार होईल.
तुम्हीपण ही recipe करून बघा व आवडली तर मला नक्की comment करा, video la like करा, share करा, channel ला subscribe करा.
धन्यवाद 🙏🏻 🙏🏻
Thankyou
Music: Feel My Rhythm
Musician: AI Music
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: