नांदेड BSNL कार्यालयात बातमी संदर्भात गेलेल्या पत्रकारास कर्मचारी,कंत्राटदाराकडून धक्काबुक्की
Автор: Times Marathi TV
Загружено: 2025-10-09
Просмотров: 598
Описание:
नांदेड येथील भारत संचार निगम BSNL कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप, टॉवर उभारणी, मजूरांची बिल, कार्यालयीन वाहनात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप.
BSNL कार्यालयातील कर्मचाऱ्यानेच माहिती अधिकारातून केला भ्रष्टाचार उजागर.
प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या चॅनलच्या प्रतिनिधीस कर्मचारी व कंत्राटदाराकडून शिवीगाळ करत धक्काबुकी.
अँकर:नांदेड येथील भारत संचार निगम BSNL कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप येथील स्थानीय BSNL कर्मचाऱ्याने केलाय.BSNL चे टॉवर उभारणी, मजूरांची बिल, कार्यालयीन वाहनात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कर्मचारी विजय जाधव यांनी केलाय.ज्यात ग्रामीण भाग BSNL सेवेसी जोडण्याच्या कामात खेड्यापाड्यात चुकीचे व बोगस ग्राहक संख्या दाखवणे, टॉवर उभारणीत जुन्या केबलची काल मर्यादा संपली नसतानाही नवीन केबल टाकून भ्रष्टाचार, एकच वाहन चार ठिकाणी दाखवून बिले काढणे, काम करत असताना काम आधी वर्क ऑर्डर नंतर सारख्या गंभीर चुका करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येतोय.दरम्यान BSNL कार्यालयातील कर्मचाऱ्यानेच माहिती अधिकारातून हा भ्रष्टाचार उजागर केला असून याची पुराव्यानिशी कागदपत्र सादर करण्यात आले आहेत. याविषयी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर झोनचे नांदेड BSNL कार्यालयाचे GM झोनल मॅनेजर अमित गुरुदासानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास साफ नकार दिला. याविषयी BSNL कार्यालय नांदेड येथे सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेले चॅनलचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांना BSNL अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदाराकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
बाईट: विजय जाधव, BSNL कर्मचारी
#cmomaharashtra #marathinews #education #news #latestnews #शिक्षणमंत्री #bsnl #bsnlrechargeplans
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: