देवांचे शाही तीर्थस्नान कुणकेश्वर जत्रा 2026
Автор: Swargiya Konkan Vlogs
Загружено: 2026-02-17
Просмотров: 1523
Описание:
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर हे दक्षिण कोकणचे काशी मानले जाते. येथील महाशिवरात्रीचा उत्सव आणि त्यानंतर होणारे 'देवस्वाऱ्यांचे स्नान' हा अत्यंत श्रद्धेचा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा असतो.
महाशिवरात्रीच्या मुख्य पूजेनंतर, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गावांतील (उदा. हिंदळे, जामसंडे, मोंड इत्यादी) अनेक देवस्वाऱ्या कुणकेश्वरच्या भेटीला येतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि "हर हर महादेव" च्या जयघोषात या पालख्या कुणकेश्वरच्या अथांग समुद्रकिनाऱ्यावर नेल्या जातात.
पवित्र स्नान: भरती-ओहोटीचा काळ पाहून, पालख्या खांद्यावर घेऊन मानकरी आणि भाविक समुद्राच्या लाटांमध्ये शिरतात. लाटांच्या सोबतीने देवांना अभिषेक किंवा स्नान घातले जाते. हे दृश्य अत्यंत चैतन्यदायी असते. या स्नानावेळी केवळ कोकणातीलच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित राहतात. अनेकांचा असा विश्वास आहे की, या दिवशी समुद्रात स्नान केल्याने पुण्य मिळते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे, जी कोकणच्या संस्कृतीचे आणि लोकजीवनाचे दर्शन घडवते.
आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुणकेश्वरातील देवांच्या शाही स्नानाचा सोहळा पाहणार आहोत....
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko...
Facebook Page
https://www.facebook.com/swargiyaKonk...
Thanks For Watching..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: