YOJANA DOOT | योजना दूत | Episode 1 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना
Автор: Batmi TV
Загружено: 2024-04-18
Просмотров: 154
Описание:
तुमच्या ओळखीत कोणी अनाथ, निराधार, बेघर मुले असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत मदतीचा ठरू शकतो...
#batmitv24x7
#क्रांतीज्योती #सावित्रीबाई_फुले फुले बाल - संगोपन योजना ही
अनाथ, निराधार, बेघर, संरक्षण व निवाराची गरज असलेल्या १८ वर्ष वयोगटातील मुला - मुलींसाठी महाराष्ट्र सरकारची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले #योजना लाभदायक आहे. या योजनेअंतर्गत मुला मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी त्यांना पर्याय कुटुंब उपलब्ध करून देणे, व तेथील कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
बालसंगोपन योजना अंतर्गत आता नवीन सुधारित शासन निर्णयानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला 2250 रु. मुलांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बालसंगोपन योजना सदर लाभार्थ्यांसाठी बंद करण्यात येईल, याची नोंद संबंधित लाभार्थ्यांनी घ्यावी.
बालसंगोपन योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
बालसंगोपन योजनेसाठी Online Form भरण्याची सुविधा संबंधित विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी कुटुंबातील संगोपन करणाऱ्या पालकांनी बालसंगोपन योजनेचा अर्ज (form) किंवा बालसंगोपन योजना अर्ज Pdf नमुना संबंधित जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (ICDS) कार्यालयात जमा करावा. फॉर्म जमा केल्यानंतर संबंधित विभागाकडून अर्जाची पडताळणी केली जाईल, त्यानंतर लाभार्थी बालक पात्र असल्यास अंतिम मंजुरी देऊन बँकेत दरमहा परिपोषण अनुदान देण्यात येईल.
बालसंगोपन योजना आवश्यक कागदपत्रे :
विद्यार्थ्यांचा शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र
आई-वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र
लाभार्थी व पालकांचा आधारकार्ड
सांभाळ करणाऱ्या पालकांचा फिटनेस
पालकांचा संगोपन हमीपत्र
उत्पन्नाचा दाखला
बालकाचा जन्माचा दाखला
बॅंक पासबुक झेरॉक्स
लाभार्थी बालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
रहिवासी दाखला
महाराष्ट्र सरकारच्या अशाच इतर योजनांची माहिती मिळवण्यासाठी बातमी टीव्ही ला सबस्काईब करा,
राजकीय व सामाजिक व इतर घडामोडी साठी आम्ही घेऊन आलो आहे बातमी टीव्ही आवाज महाराष्ट्राचा.......
नक्की पहा, न विसरता Subscribe करा तुमचा channel BatmiTV.
To Follow बातमी TV's WhatsApp Channel, click now at https://shorturl.at/fosI1
बातमी TV's other social media platforms:
► Visit to the Website: https://www.batmitv.com/
► Like us on Facebook: / batmitv24x
► Follow us on Twitter: / batmitv24x7
► Follow us on Instagram: / batmitv24x7
► Follow us on Koo: https://www.kooapp.com/profile/BatmiT...
► Follow us on Snap Chat: https://www.snapchat.com/add/shivsena...
राजकीय व सामाजिक व इतर घडामोडी साठी आम्ही घेऊन आलो आहे बातमी टीव्ही आवाज महाराष्ट्राचा.......
नक्की पहा, न विसरता Subscribe करा तुमचा channel BatmiTV.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: