खाकी वर्दीतला गुन्हेगार... महिन्यांला 25 कोटींची कमाई, कोण आहे काँन्स्टेबल शामसुंदर गुजर?
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-01-22
Просмотров: 43206
Описание:
केंद्र सरकारचे नशामुक्त भारत अभियान सुरु आहे. पण ज्यांच्यावर हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आहे, तेच पोलिस सध्या तरुणांना नशेच्या मायाजालात ओढताहेत. पुणे एलसीबीच्या पथकाने, चार दिवसांपूर्वी शिरुर येथील गॅरेजचालक शादाब शेखला एक किलो ड्रग्जसह अटक केली. त्याच्याकडील मालाची किंमत होती तब्बल 2 कोटी रुपये... हे ड्रग्ज कुणी दिले? कुठून आणले? कसे आणले? हा तपास सुरु असताना, मात्र पोलिस चक्रावले. या ड्रग्जचा माफिया, दुसरा- तिसरा कुणी नसून आपल्यातलाच एक पोलिस कर्मचारी आहे, हे तपासात समोर आले. बक्लल नं. 2205, नेमणूक- अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा, नाव- शामसुंदर विश्वनाथ गुजर, या नगरच्या एलसीबीतील पोलिसाने ड्र्ग्ज वितरणाचा हा सगळा प्लॅन आखल्याचे समोर आले. हे सगळे धक्कादायक आहे. संगमनेरचे आ. अमोल खताळ व श्रीगोंद्याचे आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी गेल्या महिन्यांत हिवाळी अधिवेशनात नगरच्या पोलिसांची कुंडली मांडली होती. नगरचे काही पोलिस किती करप्टेड आहेत, हे त्यांनी तारांकीत प्रश्नात सांगितलं होतं. परंतु आता थेट पुराव्यासह पोलिसांचे काळे कारनामे समोर आल्याने पोलिस दलातच नाही, तर सामान्यांतही खळबळ उडाली आहे. कोण आहे हा गुजर? तो कसं ड्रग्ज रॅकेट चालवायचा? गुजरमुळे इतर पोलिसांचं टेन्शन का वाढलंय? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: