अहमदनगरचा भुईकोट किल्ला | Ahmednagar Fort
Автор: Nagar Trekkers
Загружено: 2020-05-06
Просмотров: 1045
Описание:
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले.
.
त्यामधून विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली.
.
याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. .
या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. .
हा भुईकोट किल्ला अंडाकृती आकारात बांधलेला असून या किल्ल्याचे क्षेत्रफळ १ मैल - ८० यार्ड इतके विस्तारलेले आहे .
.
याला 24 बुरूज असून जमिनीपासून ची साधारण उंची 18 मीटर आहे .
त्या काळी हा एकमेव असा किल्ला होता जो जमिनीवर बांधलेला , तितकाच मजबूत अन जिंकण्यासाठी अतिशय कठीण असा होता . .
ह्या किल्ल्याला चहुबाजूने खंदक आहे अन या खंदकात पाणी आहे
.
. ह्या किल्ल्याला बचावासाठी एक झुलता पूल बांधलेला होता
.
• भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी १५५३ साली बांधण्यास सुरवात केली.
.
• चांदबिबीने जुलै १६०० मध्ये युध्दात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला.
.
• १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडुन विकत घेतला
.
• १७९७पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला
.
• १२ ऑगस्ट १८०३ ला जनरल वेलस्लीने जिंकला
.
• १९४२ च्या चले जाव आंदोलनातील राजकीय कैद्यांना येथे डांबण्यात आले, त्यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी होते
.
• १९४७ ला भारत सरकारच्या सैन्य दलाच्या ताब्यात. .
डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. .
याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. .
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान .
व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
.
सध्या हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे, .
या किल्ल्याच्या आतून आणि बाहेरून घनदाट झाडी आहे तसेच बाहेरील बाजूस खंदकात पाणी साचल्याने येथे अनेक पक्षी, सर्प आणि काही प्राणी सुद्धा आढळून येतात.
.
सध्या हरियाली, गुगळे फार्म मॉर्निंग ग्रुप सारख्या सामजिक संस्था व वन विभाग, महानगर पालिका आणि जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने येथे हजारो नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली आहे..
.
तसेच कील्याभोवती बाहेरील बाजूने जॉगिंग ट्रॅकची बांधणी देखील करण्यात आली आहे.
.
नगर शहराची ओळख असणाऱ्या या ऐतिहासिक आणि निसर्गाने नटलेल्या परिसराला अभ्यासू भेट द्याच.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: