श्री सार्थ ज्ञानेश्वरी | अध्याय पहिला | ओवी 59 वी आणि 60 वी | Dnyaneshwari
Автор: Dhwani Book
Загружено: 2023-01-27
Просмотров: 250
Описание:
@DhwaniBook
Book Name : श्री ज्ञानेश्वरी
रचिताकार: संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ ; मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.
फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
संदर्भ: सार्थ श्री ज्ञानेश्वरी (साखरे महाराज)
माऊलींची ज्ञानेश्वरी सर्वांपर्यंत पोहचावी हाच आमचा उद्देश. श्रोत्यांना जर काही त्रुटि आढळली तर मोठ्या हृदयाने आम्हास क्षमा करा.
धन्यवाद.
Dhwani Book
Voice over: Shivam Shinde
Audio and Video editing : Shivam Shinde
#dnyaneshwari
#santdnyaneshwar
#maulichyaovya
#dnyaneshwari_Ovi
#श्रीसार्थज्ञानेश्वरी
#ज्ञानेश्वरी
#marathidnyneshwari
#dnyaneshwari_ovi
#dnyaneshwari_In_Marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: