उदासी तंत्र कपाशी ला मावा तुडतुडे पांढरीमाशी साठी फवारणी |
Автор: शेतवारी SHETWARI
Загружено: 2021-08-02
Просмотров: 35650
Описание:
उदासी तंत्रानुसार कपाशी ला मावा तुडतुडे पांढरीमाशी साठी फवारणी | #कपाशी फवारणी | #मावा #तुडतुडे
#mavatudtudepandharimashi|
#उदासीतंत्रज्ञानकापूसफवारणी |
#उलाला|
#निंबोळीअर्क|
#मावा|
#कापूसफवारणीउदासीतंत्र |
#तुडतुडे|
#तुडतुडेपांढरीमाशी|
खूप शेतकऱ्याचां प्रश्न होता की कापसावर मावा , तुडतुडे, पांढरीमाशी आहे तर काय करावं?
तर
काही जणांचा प्रश्न होता की कापसावर दुसरी फवारणी सोबत म्हणजेच निम ऑईल आणि गाईच्या गोमुत्रा सोबत आपण उलाला आणि निंबोळी अर्क टाकू शकतो का ?
तर या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मधे आपल्याला मिळणार आहेत..तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..आणि चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा.
चला तर आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया .
कपाशी वरील मावा ,तुडतुडे , पांढरी माशी ,थ्रीप्स यासाठी उदासी तंत्रानुसार कोणती फवारणी करावी.
तर यासाठी आपल्याला कपाशी वर upl कंपनी चे उलाला आणि वरद कंपनीचे वरद शक्ती निंबोळी अर्क वापरायचं आहे.
याच प्रमाण घेताना 15 लिटर पंप साठी उलाला 8 ग्राम घ्यायच आहे. हे उलाला चे 8 ग्राम प्रमाण उदासी तंत्रा नुसार आहे याची नोंद घ्यावी.
तर निंबोळी अर्क 40 मिली प्रती 15 लिटर पंप साठी घ्यायच आहे.
ही दोन्ही औषधी चांगल्या प्रकारे मिक्स करून फवारणी करायची आहे.
आता दुसरा प्रश्न होता निंबोळी अर्क , गाईचे ताजे गोमूत्र आणि उलाला हे एकत्र फवारणी करू शकतो का ?
तर याच उत्तर आहे नाही असे आहे..आपण फक्त निंबोळी अर्क आहे उलाला याची फवारणी करायची आहे.दुसरे कोणतेही आवश्यकता नसलेले घटक यात मिक्स करू नका आणि विनाकारण खर्च वाढवू नका...असा सल्ला उदासी सर यांनी दिला आहे.
उलाला आणि निंबोळी अर्क यामुळे शेतातील संपूर्ण मावा ,तुडतुडे, पांढरी माशी याचा नायनाट होईल.
निंबोळी अर्क हे कडुलिंबाच्या निंबोळ्या पासून बनलेल असते.या मधे ॲझाडिराक्टीन' हा घटक असतो.हे निंबोळी अर्क जैविंक कीटकनाशकं मनून काम करते.निंबोळी अर्क यामुळे होणारे फायदे बघुया
पानांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पाने कडू बनतात. किडी अशी पाने खाणे टाळतात. किडीची उपासमार झाल्यामुळे शेवटी त्या मरतात.
कडू वासामुळे पिकांच्या पानांवर, फुलांवर कोवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी घालत नाही. त्यामुळे पुढील पिढी तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.
निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे किडीमध्ये नपुंसकता येते.असे खूप फायदे निंबोळी अर्काचे आहेत.
तर उलाला मधे फ्लोनिकामिड 50 टक्के हा घटक असतो..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: