पोलीस प्रशासनास आदिवासी संघटनांचे तीन दिवसांचे अल्टीमेटम-
Автор: Latur Nagari Varta
Загружено: 2025-05-25
Просмотров: 1563
Описание:
चंद्रकांत रघुवंशीवर गुन्हा दाखल न केल्यास शहादा बंद!.
*भारतीय स्वाभीमान संघाचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन;तक्रारदारांचे जबाब नोंदवले.
आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी शहादा येथील कार्यक्रमात जाहीर रित्या आदिवासी संघटनांना प्रशासनास देण्यात आला आहे.याबाबत भारतीय स्वाभीमान संघातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना निवेदन देण्यात आले.शहादा पोलीस ठाण्यात या प्रकरणातील तक्रारदार आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. यावेळी भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सामाजिक कार्यकर्ता योगेश गावीत, भारतीय स्वाभीमान संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,शहाद्याचे सुरेश पवार, दिलिप मुसळदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी दिनांक १६ मे २०२५ रोजी चंद्रकांत रघुवंशीविरोधात लेखी फिर्याद शहाद्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना दिली आहे.तरी सदर इसमाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला नाही,ही आदिवासींवर अन्यायकारक बाब आहे.१६ मे २०२५ रोजी आम्ही आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला होता.म्हणून आम्हाला आम्ही आदिवासी आहोत हे माहित असतांना देखील जाणीवपूर्वक जाहीर ठिकाणी आदिवासी संघटनांना तीनपाट असा जातीवाचक अपमानास्पद शब्द प्रयोग केलेला आहे.तक्रार नोंदवून घेत नाहीत, म्हणून पोलीस ठाण्यातच आदिवासी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांनी आजपर्यंत किती ॲस्ट्रासिटी गुन्ह्यात आरोपींना अटक केली? गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस अधिकारी सक्षम नाहीत का? अशे प्रश्न विचारत आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींना तीनपाट बोलून सार्वजनिक ठिकाणी तुच्छ लेखून अपमानित केले आहे.अपने लेव्हल की लोगों से बात होगी,असे बोलत आदिवासींची लायकी आहे,आम्ही त्याची लेव्हल आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही.चंद्रकांत रघुवंशीवर गुन्हा करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत आहे,म्हणून येत्या तीन दिवसात गुन्हा दाखल न केल्यास आदिवासी संघटनांकडून शहादा तालुका बंद ठेवून चंद्रकांत रघुवंशी व पोलीस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे,होणा-या परिणामास सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहील, असा इशारा आदिवासी संघटनांच्या वतीने भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी यांनी दिला आहे.
लातूर नगरी वार्ता#जनताएक्सप्रेस #jantaexpress #amitdeshmukh #laturcity #congress #bjp4india #निलंगा #moizsitari #लातुर #bjpnews #bjpindia #bjpvscongress #sambhajipatilnilangekar #arvindpatil #abhaysalunke #laturcity #jantaexpress #congressparty #deshmukh
#निलंगा #nilanga #nilgekar #जनताएक्सप्रेस #लातूर_जिल्ह्यातील_सोयाबीन_अपडेट #लातूरसोयाबीनभाव #लातूर
#भाजपासरकार #भाजपा #भाजपा_नेता #अमित #संभाजी
#lokmat #महाराष्ट्र #maharashtra #mahavikasaghadi
#sanjaybansode #mahayuti #laturcity
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: