विक्रमी ऊस उत्पादनासाठी 3 री फवारणी . ऊसावर GA ची फवारणी . usamadhe GA Chi favarani. 6BA and GA
Автор: Anand Advice, Information and Motivation
Загружено: 2021-09-09
Просмотров: 91445
Описание:
आपण शेतकरी शेतीमध्ये दररोज नवनवीन प्रयोग करत असतो. शेत म्हणजे प्रयोगशाळा व आपण शेतकरी म्हणजे एक प्रकारे शास्त्रज्ञ च आहोत. सर्वांनी विचार करून जपून खर्च करावा. आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेले असते की शेतीत केलेला खर्च वाया जात नाही. पण आता तसे राहिलेले नाही, कारण उत्पादकता घटत चाललेली आहे, निसर्ग आता आपल्याशी लहरी वागतोय. व त्यातच रोज एखादा औषध कंपनीचा प्रतिनिधी नवनवीन प्रॉडक्ट घेऊन येतोय. आपणच आपल्या मातीची सुपीकता टिकवून ठेवली पाहिजे, ती सुद्धा अव्वाच्यासव्वा खर्च न करता. आणि अलीकडच्या काळात तरुण शेतकरी शारीरिक कष्ट करावयास पाहत नाही. सर्व काही शेतमजुरांच्या जिवावर अवलंबून ठेवून नाही चालणार. आपल्यातले बरेच जण कमी कालावधीत जास्त पैसे मिळवण्याच्या नादात भाजीपाला या इतर शेती करत असताना सावकारी कर्जाच्या विळख्यात अडखतात व मग एखादा जमिनीचा तुकडा विकल्याशिवाय ते कर्ज फिटत नाही. आणि मग जमीन विकून जर चुकून जास्त पैसे आयते मिळाले तर मग त्याला जमीन विकून जगण्याची, चैनी करण्याची सवय लागते. आणि अस करून असून थेट आपल्या मागच्या पिढीवर अन्यायच करतोय. त्यामुळे आपल्या गरजा कमी करूया, विचार करून गरज असेल तरच खर्च करूया, व मागच्या पिढीला पण शेती करण्यासाठी शेतीच आरोग्य जपत राहूया.
धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: