जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे,आठवडा बाजार उत्साहात संपन्न
Автор: जय मल्हार न्युज चॅनेल
Загружено: 2025-12-14
Просмотров: 293
Описание:
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे,आठवडा बाजार उत्साहात संपन्न. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पळाशी येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण (प्राथमिक) विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या, “आनंददायी शनिवार” या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे, शनिवार 13 डिसेंबर रोजी शाळेच्या आवारात, आठवडा बाजाराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते, या आठवडा बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गांगुर्डे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, याप्रसंगी सरपंच भालेराव कोकणी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष गवळी डॉक्टर नितीन पवार, भिला कोकणी, योगेश गावित, लहू कोकणी, बकाराम भील, श्रीमती अनिता साबळे, श्रीमती सुशीला भिल आदींची उद्घाटन प्रसंगी उपस्थिती होती, या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील व परसबागेतील भाजीपाला विक्रीसाठी आणून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला, विद्यार्थ्यांनी वांगी, टोमॅटो, गिलके, मेथी, वाटाणे, मुळा, चना भाजी, मटकी, बटाटे, कांदे, तुर शेंग, बोरे, लिंबू, अद्रक, चवळी, काकडी आदी विविध प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी मांडला होता, या आठवडे बाजारासाठी विद्यार्थ्यांनी आपापली दुकाने मांडून, त्याचे दर पाटीवर लिहून समोर ठेवले होते, गावातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी केला, भाजीपाला खरेदी विक्री होत असताना, विद्यार्थ्यांना आनंद अनुभूती प्राप्त होत होती, या आठवडे बाजारातील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, या उपक्रमामागील मुख्य उद्देश, विद्यार्थ्यांना व्यवहारिक व व्यावसायिक शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभूती देणे हा होता, बाजारातून विद्यार्थ्यांना मोजमाप करणे, हिशोब ठेवणे, नफा–तोटा समजून घेणे, तसेच आपल्या मालाच्या विक्रीसाठी योग्य पद्धतीने प्रयत्न कसे करावेत, याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले, या आठवडा बाजारासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही सहकार्य करत, आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी देऊन उपक्रम यशस्वी केला, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र मुख्याध्यापिका श्रीमती सरिता साबळे, उपशिक्षक पुरुषोत्तम काळे, उपशिक्षिका सुलोचना वळवी, विशेष शिक्षक कैलास सोनवणे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर गंडे यांचे अनमोल सहकार्य लाभले,
विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे व नागरिकांच्या प्रतिसादामुळे हा आठवडा बाजार उपक्रम यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: