परळीत बोगस मतदानाचा धोका, शरद पवारांच्या उमेदवाराची निवडणूक आयोगाकडे धाव | Parli Election News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-23
Просмотров: 2167
Описание:
परळी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदानाचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून, मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवणे आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. दीपक देशमुख म्हणाले, 'लोकसभेला आणि विधानसभेला जे बोगस मतदान झालं, सीसीटीवी कॅमेरे बंद होते... आमच्या इलेक्शनला असं होऊ नये, ह्याच्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे.' या तक्रारीसोबतच, निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. या घडामोडींमुळे परळीतील निवडणुकीच्या वातावरणात तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#ParliElection #BogusVoting #DeepakDeshmukh #SharadPawar #ElectionCommission #MaharashtraPolitics #Parli #Beed #ElectionComplaint #VoterFraud #MarathiNews #SaamTV #NCP #ElectoralIntegrity #Maharashtra #ParliNagarpalika #Election2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: