भजन शिकू या... देवाचिये द्वारी उभा क्षणभरी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी देवाची.
Автор: Misal Guruji Bhajan Alandi
Загружено: 2023-05-30
Просмотров: 31251
Описание:
Devachiye Dwari / देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी l
तेणें मुक्ती चारी साधियेल्या ll1ll
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा l
पुण्याची गणना कोण करी ll2ll
असोनि संसारी जिव्हे वेगु करी l
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ll3ll
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणा l
द्वारकेचे राणा पांडवाघरी ll4ll
*************************************************
गायक/संवादिनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला.... डिजिटल तबला मास्टर.
तबला कंट्रोलर.... रितेश जवंजाळ.
टाळ संगत आणि कोरस... खुशी शिंबरे,आरोही बिरादार,
प्रतिक इंगोले.
कॅमेरा शुटींग....सौ.अनुसया बिरादार.
*************************************************
आयोजक....गीतार्थ पाठ, माऊली पार्क हनुमानवाडी केळगाव आळंदी. मोबा.9823150559.
*************************************************
भजन शिकू या...(उद्देश).
********************
या उपक्रमात आम्ही अनेक श्रोत्यांच्या मागणी नुसार शिकवणुकीच्या भजनांची vdo टाकणार आहोत. मित्रहो भजन हा आपल्या जीवनात निर्मळ आनंद देणारा भाग आहे.यातून भगवंताचे स्तवन होते तसेच स्वतः बरोबर इतरांनाही आनंद देता येतो.
समाजात दोन प्रकारचे गाणारे असतात...*१.उपजत गाणारे *२.शिक्षण घेऊन गाणारे.यापैकी उपजत गाणारे मोठ्या प्रमाणात आहेत.यांना थोडं जरी सांगितलं तर छान भजन होऊ शकते.
जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेत त्यांना नोटेशन काढता येते तसेच ते नोटेशन नुसार हार्मोनियम वाजवून भजन म्हणू शकतात, मात्र जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेले नाहीत आणि उपजत ज्ञानाने हार्मोनियमवर भजन म्हणतात,अशा भजनप्रेमींना वेगवेगळी भजने म्हणताना अडचण येते, तेंव्हा अशा भजनप्रेमींना आपल्या घरीच मोबाईलद्वारा थोडंसं मार्गदर्शन झालं तर भजन अधिक रंजक आणि भावपूर्ण होऊ शकते. असा उद्देश मनात ठेवून साध्या -सोप्या पद्धतीने साधी-सोपी भजने म्हणता येईल,यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.ज्यांच्यापर्यंत जाणकार पोहचू शकत किंवा जे जाणकारांपर्यंत जाऊ शकत नाहीत,अशांपर्यंत मोबाईल द्वारा पोहचण्याचा हा लहानसा प्रयत्न केला आहे.
*************************************************
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: