झटपट आणि पौष्टिक मोड आलेली मूग उसळ | Sprouted Moong Usal Recipe in Marathi
Автор: suvarnawadelu02
Загружено: 2026-02-12
Просмотров: 27
Описание:
नमस्कार मंडळी!🙏
आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी 'मोड आलेली मटकी ची उसळ '. ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे, तेवढीच ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
(Ingredients):]
. मोड आलेले मटकी :२ वाट्या
. कांदा : १ मध्यम (बारीक चिरलेला )
. टोमॅटो :१ मध्यम ( बारीक चिरलेला)
. हीरवी मिरची :२-३ (चवीनुसार )
. कढीपत्ता :७-८ पाने
. कोथिंबीर : बारीक चिरलेली
. मसाले : मोहरी , जिरे , हळद , लाल तिखट आणि चवीनुसार मीठ
. तेल :२ मोठे चमचे
कृती (Step-by-Step Recipe):]
१ . सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे , कढीपत्ता आणि हिरवी मिरची ची फोडणी द्या.
२ . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता.
३. आता टोमॅटो टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
त्यात हळद आणि तिखट घालून नीट मिक्स करा.
स्वच्छ धुवून घेतलेले मोड आलेले मूग कढईत टाका आणि चवीनुसार मीठ घालून वाफेवर ५-७ मिनिटे शिजवा.
शेवटी वरून भरपूर कोथिंबीर घालून गरमागरम उसळ सर्व्ह करा!
#MoongUsal #MarathiRecipe #HealthyBreakfast #SproutsRecipe #MaharashtrianFood #CookingVideo #VatanRecipe #MarathiFood #GavranChav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: