पावसाळ्यात कुठल्या भाज्या उगवाव्या?/MONSOON VEGETABLES IN MARATHI
Автор: Orga Kart
Загружено: 2020-07-14
Просмотров: 8732
Описание:
पावसाळ्यात कुठल्या भाज्या लावल्या पाहिजेत ?
१) भेंडी...लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी भाजी म्हणजे भेंडी. साधारणपणे दमट वातावरणामधे भेंडीचे झाड चांगल्या प्रकारे येते म्हणून पावसाच्या सुरुवातीलाच आपण भेंडीची लागवड करू शकतो.
2) दुसरी भाजी म्हणजे वांगे.ही भाजी देखील पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढते आणि म्हणूनच वांगे सुद्धा आपण पावसाळ्यात लावू शकतो
3. यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपण पावसाळ्यामध्ये निश्चितच पिकवू शकतो यामध्ये मुख्यतः पालक कोथिंबीर मेथी अशा प्रकारच्या पोस्टीक भाज्या आपण पावसाळ्यामध्ये लावू शकतो फक्त एका गोष्टीची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे आणि ती म्हणजे या पालेभाज्यांना जास्त पाण्याचा मारा करू नये.
4. टोमॅटो..रोजच्या जेवणामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये उपयुक्त असलेली ही फळभाजी आपण पावसाळ्यामध्ये लावू शकतो.
5.काकडी वर्गीय काही भाज्या आहेत त्याही आपण पावसाळ्यामध्ये पिकवू शकतो यामध्ये दुधीभोपळा तसेच गिलके दोडके कारले हे सर्व पावसाळ्यामध्ये जर आपण लावले तर निश्चितच चांगल्या प्रकारे येतात आणि पूर्ण वर्षभर फळ देतात. या प्रकारच्या भाज्यांवर खूपदा पांढरी बुरशी पडते त्यामुळे या या बुरशीचा बंदोबस्त करणेही तितकेच गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण सेंद्रिय प्रकारच्या बुरशीनाशक औषधांचा वापर करू शकतो.
6. बीटरूट अतिशय उपयुक्त अशी फळभाजी....रोजच्या जेवणामध्ये याचा उपयोग करणे खूपच गरजेचे आहे आणि तसेच पूर्ण वर्षभर ही भाजी आपण पिकवू शकतो आणि ही भाजी लावणे अतिशय सोपे देखीलआहे.
7. मुळा मुळ्याचे पराठे मुळ्याची भाजी तसेच मुळ्याची कोशिंबीर अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण मुळा हा नेहमीच जेवणामध्ये बघतो आणि ही भाजी देखील आपण पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो.
Background Music---Pahadi Dhun on santoor
Visit our website www.orgakart.com and facebook page Orgakart
#rainyseasonvegetables #homegarden #howtogrowspinach #howtogrowcoriander #saveplantsfromrain #growingspinach
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: