वैदिक सणांचे योगरहस्य भाग १७ - योगिराज मनोहर हरकरे
Автор: Vaidik Vishwa
Загружено: 2026-02-28
Просмотров: 65
Описание:
कुसुमाकर वसंत
भगवद्गीतेतील दहाव्या विभूतीयोगांत भगवंत म्हणतात, 'अहम् ऋतूना कुसुमाकर : सर्व प्राणिमात्रांना हा ऋतू प्रिय आहे. एवढेच नव्हे तर वनस्पति सुध्दा आपला आनन्द या ऋतूत फलानी बहरून प्रदर्शित करतात. 'वसन्ति अत्र वसन्तः ' अशी वसंताची शास्त्रात ग्वाही आहे. वसंताशिवाय या काळात आणखी कोणती रिती वस्ती आहे ? असा प्रश्न शास्त्रकार करतात. सहा मासापूर्वीच्या साधनापर्व शरदाचा हा वसंत ऋतू म्हणजे संगीतातील वादिसंवादीप्रामणे असलेला प्रतिऋतु होय. वसंत आणि शरद हे एकमेकांना पूरक असे ऋतु आहेत. वसंत ऋतूंत तशा फारशा साधना नाहीत. प्राचीन वैदिक ऋतुमानात वसंताला स्थान नसल्यामुळे वैदिक साधनांनाही वसंतात स्थान नसावे. वसंत ऋतूंत मनाचा उल्हास मात्र भरपूर ओसंडलेला दिसतो त्याची चुणूक म्हणजे हुताशनि वा होलिकोत्सव होय.
खेळे रंग श्रीरंग
वसंत पंचमीपासून आपल्या मकरंद चालीने सर्वजनांना उल्हसित करणाऱ्या या ऋतूराजांत फाल्गुन मासाची भर पडते. आधीच उल्हास आणि त्यांत फाल्गुन मास. वसंताचे रूपाने भगवान श्रीकृष्ण आणि फाल्गुनाचे रूपाने वीर अर्जुनाची सांगड या ऋतूत घडते. भगवंताला फाल्गुन फार प्रिय. म्हणून भगवंतच या ऋतूंत शिष्ठाचाराचे व्यर्थ आरोप झुगारून स्वतः मनमोकळेपणाने खेळतात. फाल्गुनाची आठवण झाली की लहानथोर सर्वजण फाल्गुनी पौर्णिमेची मोठ्या उत्साहाने वाट पाहतात. वर्षभर संयमात कोंडलेले मन आता भगवंताशी रंग खेळायला पाहते. भगवान श्रीकृष्णाची ती रंगीत होलिका ! गोपगोपीशी मुक्त आनंदाने खेळणाऱ्या भगवंताची आठवण येऊन विरागी योगीसुध्दा तो अमृत सोहळा पाहण्यास आतूर झाले असतात. देवगंधर्व सुध्दा तो सोहळा पाहण्यास विमानात गर्दी करतात. मग मानवांनी भान विसरून खेळात रंगल्यास काय आश्चर्य ? पौर्णिमेला ताशनि जागृत करतात. या दिवशी धुंडा देवीचे पूजन करायचे असते. अरिष्टनाश करणारी ही देवी. पण तिला बिभत्स शिव्याच प्रिय असतात. काट्याने काटा काढायचा तसा शिव्या देऊन अरिष्टनाश करायचा !
पेटलेल्या हुताशनीला 'हो दाहा' असे म्हणून तिला नैवेद्यादि अर्पण करून अधिक भडकवायचे असते. वर्षभरातील सयंमगंगेला आता महादेवाने आपल्या जटाभारातून जशी आकाशस्थ गंगा मोकळी केली तद्वत मोकळी करायची असते. दुसऱ्या दिवशी सकाळी गानयोगाने भगवान शिवाला प्रसन्न करायचे असते. गायक मंडळी धृपद धमार गायनाने भगवंताला प्रसन्न करतात. भांग घोटली जाते आणि शिवाच्या पिंडीप्रमाणे आकार असलेल्या वरवंट्यावर सोमरसाचा प्रथम नैवेद्य दाखवून नंतर तो सोमरस सर्वांनी प्राशन करायचा असतो. या रितीवरून प्राचीन काळात केव्हातरी या दिवशी सामगायन करून सोमरस प्राशन करायचा परिपाठ असावा. आता सोमरस राहिला नाही की सामगायन राहिले नाही. मग तो उत्सव करायचा नाही काय? करायचा । सोमा ऐवजी भांग आणि सामाऐवजी धृपद धमार गायन ! आता धृपद धमार गायनहि दुर्मिळ झाले आहे म्हणून इतर गायकीने भक्त भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. फगवा साजरा केल्या जातो, रंग उडविल्या जातो आणि गुलाल उधळल्या जातो. मृदंग लयकार होऊन तालाच्या समेवर गायन सुरू होते, 'फगवा ब्रिज देखन को चलो री' या माहिन्यात झाडांना हिंदोळे बांधून मनसोक्त झोके घ्यायचे असतात. आम्रवृक्षांना बहर आलेला असतो. त्या आम्रकुसुमांचे प्राशन फाल्गुन वद्य प्रतिपदेला करायचे असते. त्यामुळे गायकाचा गळा निरोगी बनून त्याचा वर्षभर आवाज चांगला राहतो.
द्वितियेला श्रीसंत तुकाराम बीज असते, एकनाथ षष्ठीला सूर्य मीन राशीत प्रवेश करतो, आणि नवमीला तो उत्तराभाद्रपदा नक्षत्रात प्रवेशतो. एकादशीला पापमोचनी एकादशी आहे. त्रयोदशीला विषुवदिन येतो. या दिवशी दिवस आणि रात्र सारखी असते. संक्रांतीसारखाच हा सण आहे. चतुर्दशीला शिवरात्री आणि अमावस्येला दर्श अमावस्या हा सण आहे. शनिवारच्या दिवशी अमावस्या आल्यास त्या योगाला खर्पर योग म्हणतात. हा योग दुर्भिक्षकारक असतो असे म्हणतात. फाल्गुन मास आता परततो. चैत्र उगवतो #yog #music #kundalini
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: