पावसात भिजल्यामुळे खरंच सर्दी-ताप येतो का? अशी घ्या पावसाळ्यात काळजी
Автор: 2k creation
Загружено: 2023-07-20
Просмотров: 230
Описание:
पावसात भिजल्यामुळे खरंच सर्दी-ताप येतो का? अशी घ्या पावसाळ्यात काळजी
नमस्कार मित्रांनो, आपल्या लोकप्रिय "2kcreation" चॅनेल वर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात स्वतः ची काळजी कशी घ्यावी हे पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करुया...
खरे पाहता, पावसात भिजण्याचा आणि ताप येण्याचा किंवा सर्दी होण्याचा तसा थेट संबंध नाही. पावसात भिजल्याने जर ताप येत असेल तर मग रोज आंघोळ केल्यानेही यायला पाहिजे.
कारण बाराही महिने थंड पाण्याने स्नान करण्याचा कित्येक लोकांचा नित्य परिपाठ असतो. तरीही पावसात भिजलात तर खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
पावसात नुसते भिजल्याने सर्दी होत नाही. भिजल्यावर बराच काळ अंग, अंगावरील कपडे, केस ओले राहिले तर आपल्या शरीराचे तपमान कमी होते. शरीर थोडे थंड झाल्यामुळे नाकातील सिलीअरी पेशी उत्तेजित होतात.
आणि शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे सुरु होते. हा प्रकार शरीराचे संरक्षण करण्यासाठी असतो. तो आजार नसतो. पावसात भिजल्यावर केस आणि अंग कोरडे केले आणि भिजलेले कपडे लगेच बदलले तर हा त्रास होत नाही.
पावसाळी दमट हवा आणि पावसाळ्यातील तपमान अनेक प्रकारच्या विषाणूंना पोषक असते. पावसात भिजल्याने कमी झालेले शरीराचे तपमान अनेक विषाणूंच्या पथ्यावर पडते.
साहजिकच घशात आणि नाकात अनेक विषाणू शिरतात, त्यांची संख्या वाढते आणि मग घसा दुखतो आणि ताप येतो. हे विषाणू घशातून श्वासनलिकेकडे सरकले की खोकला सुरु होतो.
साहजिकच पावसात भिजून आल्यावर अंग कोरडे करणे, कपडे बदलणे याबरोबरच कोमट पाण्याच्या गुळण्या करणे एवढे पुरेसे असते. ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ताप निवारक औषधे घ्यावीत.
पावसाळ्यात अनेक लोक सतत पावसात भिजतात. पावसात भिजल्यावर अंगावरचे कपडे न बदलता ओले कपडे घालून दिवसभर वावरत राहतात. यामुळे जांघा, काखा, स्त्रियांच्या स्तनांखालील जागा यात 'टिनीया क्रुरीस' हे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात भिजणे झाले नाही तरी पाण्यातून जाताना पाय ओले राहतात. त्यामुळे पायांच्या बेचक्यांमध्ये चिखल्या होणे, नखांची फंगल इन्फेक्शन्स होण्याचे त्रास होऊ शकतात.
असे त्रास झाल्यास जाहिरातीतली दाद-खाज-खुजली असली मलमे लावू नयेत तर तुमच्या डॉक्टरांना किंवा त्वचारोग तज्ज्ञांना दाखवून घ्यावे.
शहरामधील पावसात प्रदूषणातील रासायनिक घटक विरघळलेले असतात. त्यामुळे डोळ्यांची आग होते. पण सध्या स्वच्छ पाण्याने डोळे दिवसातून तीन-चार वेळा धुतल्यास ती आग कमी होते. न झाल्यास नेत्रतज्ञांना दाखवून घ्यावे.
पिण्याचे पाणी
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबद्दल विशेष जागरूक राहावे. पिण्याच्या पाण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. दूषित पाणी प्यायल्याने उलट्या, जुलाब, रक्ती आव, आमांश, कॉलरा, टायफॉइड, पॅराटायफॉइड अशांसारखे जीवाणूजन्य आजार होऊ शकतात.
काविळीचे हिपॅटायटिस ए आणि इ, लहान बालकांना जुलाबाची पीडा देणारा रोटाव्हायरस, बालकांना पंगू करून सोडणारा पोलिओमायलायटिस असे विषाणूजन्य आजारदेखील दूषित पाण्यातून पसरतात.
यावर उपाय म्हणजे सुरक्षित आणि जीवजंतूविरहित शुद्ध पाणी पिणे. घरी पाण्यासाठी फिल्टर असेल तर काही प्रश्न नसतो, पण ग्रामीण भागात आणि फिल्टर्स न परवडणाऱ्या नागरिकांनी पाणी स्वच्छ तिपदरी फडक्याने गाळून घ्यावे.
नंतर ते उकळून निववावे आणि पिण्यासाठी वापरावे. बाहेरील पाणी शक्यतो पिऊ नये. स्वतःची पाण्याची बाटली जवळ बाळगावी.
प्रवासात किंवा गावामध्ये फिरताना स्वतःची पाण्याची बाटली वापरण्याऐवजी अनेकदा मिनरल वॉटर वापरण्याचा प्रघात आजकाल दिसून येतो. मात्र मिनरल वॉटर बनवणाऱ्या कंपनीच्या दर्जाची खात्री करून घ्यावी.
पावसाळ्यातील आहार
पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी शुद्ध आणि सकस आहार खूप महत्वाचा असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया बिघडण्याची समस्या अनेकांना उद्भवतात. त्या टाळायच्या असतील तर-
बाहेरचे अन्न, उघड्यावरचे पदार्थ, कच्चे अन्नपदार्थ खाऊ नये. घरी बनवलेले जेवण आरोग्यास हितकारक असते. आरोग्याला पोषक असेच अन्न सेवन करावे.
नेहमी ताजे, गरम, शिजवलेले, पचण्यास हलके अन्न खावे. मासे, मटण असा मांसाहार टाळावा. पावसाळा हा माशांचा प्रजोत्पादनाचा काळ असल्यामुळे मासे खाणे टाळावे. याकाळात माशांपासून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
मांसाहार जड असल्याने पचनक्रिया बिघडते. पाणीपुरी, भेळपुरी, वडे, भजी, सामोसे असे उघड्यावरचे जंकफूड टाळावे. आंबट व थंड पदार्थ खाणे टाळावे.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर 'Like' आणि 'Share' नक्की करा. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. यासोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हेही सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय "2kcreation" चॅनेलला " Subscribe" करा.
मुलांनी नुडल्स खाल्याने कोणते दुष्परिणाम होतात हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ वर क्लिक करा.
धन्यवाद...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: