रायगडात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडली, बंडखोरांचा घेतला समाचार I Aditya Thackeray
Автор: Lokshasan News
Загружено: 2022-08-17
Просмотров: 3326
Описание:
#adityathackeray #लोकशासन #lokshasan #alibaug
रायगड: धम्मशील सावंत
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची आज तोफ धडाडली. शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे अलिबाग मध्ये आले होते. अलिबाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पासून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या बालेकिल्ल्यात जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. आता जी गद्दारी झाली त्यात रायगडला काय मिळालं? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
अलिबाग व महाड या दोन तालुक्यात शजाहीर सभेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर कडाडून हल्ला चढवीत आहेत. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते,आमदार राजन साळवी, माजी आमदार मनोहर भोईर, बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख किशोर जैन, महिला संघटक दिपश्री पोटफोडे , शंकर गुरव आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: