Marathi bhasheche Swarup मराठी भाषेचे स्वरूप (मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाणभाषा)
Автор: ज्ञानभाषा मराठी
Загружено: 2021-06-02
Просмотров: 13618
Описание:
अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा • bhashechi mulbhut Ghatak/भाषेचे मूलभूत घट...
विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा व तिचे स्वरूप या videochya माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा छोटासा प्रयत्न .
#bhashechiSwaroop
#MarathibhashecheSwarup
#matrubhasha
#bolibhasha
#pramanbhasha
#lipi
#मराठी भाषेचे स्वरूप
भाषाही आपण इतरांपासून शिकतो. व्यवहारासाठी भाषेची फार जरुरी असल्यामुळे आपण तिचा वापर लहानपणापासून करतो.
#भाषा
विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय.
ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात.
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.
भाषा सतत प्रवाही असते .तिच्यात नेहमीच बदल होत असतात.
ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या पाच कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून आहे.
भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश असून भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्यक्षेत्रात भाषा आत्मविष्कार आचे माध्यम आहे.
#भाषेचे स्वरूप
#मातृभाषा
मातेच्या द्वारा प्राप्त झालेल्या भाषेला मातृभाषा म्हणतात. म्हणजेच आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात.
#बोलीभाषा
रोजच्या जीवनात संपर्कासाठी संवादासाठी आपण जी भाषा वापरतो तिला बोली भाषा म्हणतात. बोली भाषा असंख्य आहेत.
#प्रमाणभाषा
ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक ,साहित्यिक तसेच शासकीय दृष्टीने केला जातो तिला प्रमाणभाषा असे म्हणतात.
मराठी भाषा ही संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या भाषेपासून विकसित झालेली आहे.
भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष् या धातूपासून आला असून याचा अर्थ बोलणे असा होतो.
#लिपी
आपण भाषा ही ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात.
मराठी भाषेची लिपी देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात.
लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले असून मराठी, गुजराती, संस्कृत ,बंगाली, पाली या भाषांची लिपी देवनागरी आहे.
देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असेसुद्धा म्हणतात .
प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्हे असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात .
मोडी लिपी
मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती तिला मोडी लिपी म्हणतात .पण काळानुसार ती लोप पावले आहे.
अशीही आपली भाषा माणसामाणसांमधील आदानप्रदानाचे साधन असून भाषेने मानवी जीवन व्यापलेले आहे. म्हणूनच आपल्या जीवनात अविभाज्य घटक असणाऱ्या मातृभाषेचे स्वरूप, मूलभूत संकल्पना आपण समजून घ्यायला हवी.
#भाषेचेस्वरूप
#मराठीभाषेचेस्वरूप
#मातृभाषा
#बोलीभाषा
#प्रमाणभाषा
#लिपी
भाषा ही जीवनाची मूलभूत गरज असुन आयुष्यभर भाषा आपल्याला आपल्या विकासासाठी मदत करते. व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासासाठी भाषेचे मोठे योगदान आहे. आपली संस्कृती भाषेच्या माध्यमातून विकसित होत असते.. त्या भाषेचे मूलभूत ज्ञान खूप गरजेचे आहे . मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही भाषेचे स्वरूप समजावून घ्या.धन्यवाद ..!
video maker and editor = ganpati sawant
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: