BaiManus Voices of Rural Maharashtra, Unfiltered | Grassroots Stories That Matter| Dr. Rekha Shelke
Автор: Sandeep Inamke Studio
Загружено: 2026-01-17
Просмотров: 215
Описание:
Dr. Rekha Shelke Principal, MGMU CCCM
Ph.D. (Public Relations)
MGMC link : https://journalism.mgmu.ac.in/rekha-s...
BaiManus | Voices of Rural Maharashtra, Unfiltered
Grassroots Stories That Matter | ft. Dr. Rekha Shelke
BaiManus is a grassroots digital media platform committed to amplifying the real, unheard voices of rural Maharashtra. This episode features Dr. Rekha Shelke, bringing sharp insight, lived experience, and ground-level perspective to issues that mainstream narratives often overlook.
From rural women’s realities and social inequalities to education, health, and systemic challenges — this conversation goes beyond headlines to document truth as it exists on the ground.
#बाईमाणूस!
माझ्यासारख्या एका सर्वसामान्य #बाईच्या हातून #बाईमाणूस या आगळ्यावेगळ्या दिवाळी अंकाचं प्रकाशन होणं हा केवळ माझा सन्मान नाही, माझ्या लेखणीचाही नाही तर जन्मापासूनच, माणूसपणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देणाऱ्या परिघाबाहेरच्या #प्रत्येक_बाईचा सन्मान आहे.
MGM विद्यापीठाचे कुलपती माननीय अंकुशराव कदम साहेब आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ सर यांच्या उपस्थितीत बाईमाणूसच्या, आदिवासी लोकजीवनावर प्रकाश टाकणाऱ्या दिवाळी अंकाचं प्रकाशन करता आलं. विशेष म्हणजे मा.अंकुशराव कदम साहेब यांच्या आग्रहास्तव #फिन्द्री च्या प्रवासाबद्दलही सांगता आलं.
MGM विद्यापीठाच्या भव्य परिसरात काल एक चिमुकलं आदिवासी गावच "चिंतनगाह" मध्ये अवतरलं होतं! एक गोटूल, त्याच्या आसपास आदिवासींच्या झोपड्या, गेरूनं रंगवलेल्या भिंतींवरची पांढरीशुभ्र वारली पेंटिंग, पारंपरिक आदिवासी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींची किलबिल आणि बाईमाणूस टीमची लगबग! सगळं काही अवर्णनीय! चैतन्यदायी !
शेजारी दीपावली संध्येसाठी सुसज्ज स्टेज व्यवस्था, विद्यार्थिनींनी सादर केलेली दीपावली गीतं आणि आदिवासी नृत्य तर आ..हा...हा.... !!! बहारदारच!!!!!
बाईमाणूसचे संपादक प्रशांत पवार सर यांनी, आता प्रमुख पाहुण्यांनी दिवाळी अंकाचे प्रकाशन करावे असे सांगितले, पण दिवाळी अंक कुठंय? बघते तर काय! #बाईमाणूस दिवाळी अंक , गोटूलच्या आत, केळीच्या पानांमध्ये गुंडाळून ठेवलेले! पाहुण्यांच्या हस्ते बाईमाणूसचे ते अंक बाहेर आणून मग त्याचे प्रकाशन केले गेले! किती ही आगळी वेगळी गोष्ट! खरंच आयोजनातील प्रत्येक गोष्ट अगदीच कल्पक आणि नाविन्यपूर्ण होती !
बाईमाणूस दिवाळी अंकाला शुभेच्छा देताना मा. अंकुश कदम सरानी जे वक्तव्य केलं ते ऐकताना त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे प्रतिबिंब त्यात काठोकाठ भरलेले होते. मा. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ सर यांनी केलेले फिन्द्रीचे कौतुक खूप सुखावणारे होते.
#बाईमाणूस ! प्रशांत पवार या अवलिया माणसाच्या हातून तावून सुलाखून निघालेला आणि डॉ. रेखा शेळके यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा अंक आहे. हा आदिवासींच्या जगण्याच्या अनेक अंधाऱ्या कंगोऱ्यांना प्रकाशात आणणारा अत्यंत देखणा दिवाळी अंक आहे.
#इन्सानियत हा शब्द आपण कितीदा ऐकलाय, पण #आदिवासीयत कधी ऐकलाय? नाही , कारण असे शब्दच अस्तित्वात नाहीयेत. मात्र प्रशांत पवार यांनी आपल्या संपादकीय लेखात जे वास्तव मांडलं आहे ना ते वाचताना आपण निशब्द होतो. खूप कमी शब्दांमध्ये त्यांनी माणुसकीचे हे दुर्लक्षित रूप वाचकांच्यापुढे मांडले आहे.
आपण #कुर्मा हा शब्द फक्त , कुर्मा- पुरी खाण्याबद्दलच ऐकलाय पण कुर्मा घराबद्दल कधी ऐकलंय का? नाही ऐकलं? बापरे!!!!! आदिवासी स्त्रियांच्या जगण्याला लागलेला हा एक शाप किती भयंकर आहे हे वाचताना अंगावर सर्रकन काटा
येतो. तुम्हाला याबद्दल माहिती करून घ्यायची असेल ना, तर मग सुरजचा लेख तुम्ही वाचाच!
काय म्हणालात? AC भारत सरकार हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकताय? मग तर तुम्ही निलेश धोत्रे ने सांगितलेले AC भारत सरकारचे विस्मयकारक आणि हादरवून सोडणारे वास्तव वाचलेच पाहिजे!
भारतात एक आफ्रिकन गाव आहे ? काय!!! हे अजून तुमच्या कानावर पडलेलेच नाही ? काळजी करू नका , त्यासाठी तुम्हाला आफ्रिकेला जाण्याची गरज नाही. नम्रता भिंगार्डे तुम्हाला तो गाव बाईमाणूस मधून फिरवून आणेल.
तुम्ही मथुरा केस बद्दल आजपर्यंत वाचलं असेल हो , पण, शपथ सांगते.... ज्या पद्धतीने, संजना नावाच्या या धाडशी पत्रकार पोरीने या केसच्या तळाशी जाऊन, कितीतरी बाबींचं सत्य अगदी फोटोसहीत बाहेर आणलंय ना! त्याला तोड नाही.
माननीय हेरंब कुलकर्णी, Heramb Kulkarni यांचा आमू आखा एक से, प्रमोद मुनघाटे Pramod Munghate यांचा मावा नाटे, मावा राज, विरा राठोड Veera Rathod हुशss तीरर्sss फकाटsss , Motiram Poul यांचे बाजारात भेटलेल्या कष्टकरी बाया हे विचारप्रवन करणारे लेखन हे बाईमाणूसचे आणखी एक आकर्षण आहे. #फक्त_200_रुपये ही किंमत या वैचारिक खजिन्यासाठी सर्वांना परवडेल अशीच आहे.
काल #बाईमाणूसच्या अशा या अनोख्या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहता आलं. खरं सांगू MGM विद्यापीठाचे कुलपती आणि कुलगुरू अशा दोन दिग्गज माणसांच्या मध्ये बसताना थोडा संकोच वाटला होता, पण समोरच्या स्तंभावर कोरली गेलेली #बाबासाहेबांची_सही दिसली आणि त्यांनी आपल्याला खरंच माणसांत बसवलं या भावनेनं मन भरून आलं. आपण #बाईमाणूस आहोत याचा अभिमान वाटला! डॉ. रेखा शेळके मॅडम Rekha Shelke प्रशांत पवार सर , बाईमाणूस टीम आणि MGM चे मनःपूर्वक आभार !
अंकासाठी संपर्क : सूरज पटके सुरज लता प्रकाश
7798641043
७७९८६४१०४३
Sunita Borde
#diwalivibes #दिवाळीअंक #बाईमाणूस #marathisahitya #फिन्द्री #Findri #motivational
#adivasiculture #MGMUniversity
@highlight
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: