Nashik News | सप्तशृंगी गडावर कोजागिरी निमित्त कावडधारकांचे आगमन
Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)
Загружено: 2025-10-07
Просмотров: 184
Описание:
NASHIK | साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कावडधारकांचे आगमन
#nashiknews #nashik #saptsrungi #सप्तशृंगी #saptshrungi #accidentnews #shindegovernment #maharashtranews #loknayak_news #मराठीबातम्या #maharashtrapolice @loknayaknews
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कावड यात्रेला सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि नाशिक येथून कावडधारकांनी गडाकडे पायी कावड यात्रा सुरू केली आहे.
ही यात्रा पंचवटी येथून मध्यरात्री १२ वाजता जल घेऊन सुरू झाली असून, कावडधारक दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व वणी परिसरात दाखल होत आहेत. अवघ्या ८ तासांत ४५ किलोमीटरचा प्रवास करून भक्तगण गडावर तीर्थ अर्पण करण्यासाठी पोहोचणार आहेत.
गेल्या ३० वर्षांपासून ही परंपरा जपत असलेल्या कावडधारक भुवनेश्वर कापसे यांनी सांगितले की, “आम्ही वर्षानुवर्षे न चुकता ही सेवा करतोय. गडावर देवीचं दर्शन आणि तीर्थ अर्पण हे आमचं जीवनध्येय आहे.”
BYTE - मंगेश सोळसे पेठ
BYTE - कुणाल लोहगाव कर, त्र्यंबकेश्वर कावड धारक
BYTE - भुवनेश्वर कापसे - त्र्यंबक
NASHIK | सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात ; बस थेट 400 फूट दरीत कोसळली
ANC - नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.
अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव असा बसचा प्रवास सुरू झाला होता. यातच वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसचा मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: