धुळ्यात ऐतिहासिक निकाल ; १६ वर्षीय सनी साळवे खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)
Загружено: 2023-12-21
Просмотров: 12123
Описание:
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @loknayaknews
#dhulelivenews #dhuletopenews #dhulecrime #dhulecity #dhulecollege #dhulepolice #dhulecrime #crime_news #crimestory #murdermystery #murdermystery2 #murdercase #sanisalave #dhulecourt #dhulejudjement #courtjudgement
DHULE | धुळ्यात ऐतिहासिक निकाल ; १६ वर्षीय सनी साळवे खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
ANC : धुळ्यातील १६ वर्षीय विद्यार्थी प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खून प्रकरणातील चार आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. धुळे शहरातील चंदन नगरातील रहिवासी सनी साळवे व त्याचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर दि. १८ एप्रिल २०१८ रोजी खूनी हल्ला करण्यात आला होता. मोटारसायकलचा कट लागला म्हणून त्यांना जितू फुलपगारे याने साथीदारांसह अडवत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी सनी साळवे याला चाकू, गुप्तीने भोसकल्याने तो दगावला होता. तर त्याचा मित्र व भाऊ हे देखील या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेनंतर देवपूर पोलिसांत जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे, दादा फुलपगारे, गोपाल चौधरी, भैय्या बाविस्कर, सनी सानप यांच्यावर भादवी कलम ३०२, ३०७, ३२३, १४१, १४७, १४८, १४९ सह अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सनी साळवे खून खटला हा धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने सर्व साक्षी, महत्वाचे पुरावे तपासून आज निकाल दिला. यामध्ये तत्कालीन डीवायएसपी सचिन हिरे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच फिर्यादी सागर साळवे, प्रत्यक्ष साक्षीदार सुमेध सूर्यवंशी, सौरभ साळवे यांच्या साक्षी दिशादर्शक ठरल्यात, त्यानुसार जिल्हा न्यायालय क्र. ५ चे न्यायमूर्ती डी. एम. आहेर यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. यात मुख्य आरोपी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे यांना भादंवि कलम ३०२, ३०७, ३२३, १४७, १४८, १४९ व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. या चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. तर आरोपी दादा फुलपगारे हा खून व खूनाचा प्रयत्न कलमांतून निर्दोष सुटला. मात्र, त्याला इतर कलमांन्वये शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे त्याला आणखी साडेतीन वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. सनी साळवे खटल्याकडे अवघ्या धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. हा खटला जिंकण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. शामकांत पाटील, ॲड. सी.डी. सोनार, ॲड. निलेश दुसाणे, ॲड. विशाल साळवे, ॲड. उमाकांत घोडराज आदी वकिल विशेष मेहनत घेत होते. वकिलांच्या एकत्रित मेहनतीमुळेच सनी साळवेला न्याय मिळाल्याची जनभावना दलित समाजातून उमटली आहे. सनी साळवे खून खटल्यातील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर सनीचे आई-वडिल, भाऊ, बहिण हे जिल्हा नायालयापासून शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळ पोहोचले. त्यांनी महामानवाला अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब लिखित संविधानावर आमचा पुर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया सनी साळवे यांच्या बहिणीने यावेळी दिली.
BYTE : ॲड.विशाल साळवे
BYTE : स्नेहा साळवे, सनी साळवे ची बहिण
#लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
#newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या
#topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
#breakingnews #trendingnews
#marathinewsupdates #marathibatmya
#nationalnews #mns #localnews
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews
All about this channel
marathi live news
marathi news
mumbai news
Live TV
मराठी बातम्या
ऑनलाईन बातम्या
marathi online news
maharashtra politics
latest marathi news
maharashtra breaking news
NCP
Shivsena
मराठी
मराठी बातम्या
marathi
marathi news
marathi news live
todays marathi news
Maharashtra political news
national news in marathi
marathi batmya
sharad pawar
ajit pawar
devendra fadnavis
uddhav thackeray
maharashtra politics
raj thackeray
marathi batmya
marathi batmya live
latest marathi news
marathi news video
latest news
मराठी बातम्या लाईव्ह
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: