Chivada Recipe |
Автор: Vaishali's Recipe
Загружено: 2025-10-10
Просмотров: 1926
Описание:
#chivdarecipe #chivda #vaishalisrecipe
चिवडा मसाला करून बनवलेला स्वादिष्ट पोह्यांचा चिवडा | Crispy Poha Chivda Recipe | Diwali Faral
हलका, कुरकुरीत आणि मसाल्याच्या योग्य प्रमाणामुळे एकदम लज्जतदार लागतो. आज आपण खास घरचा बनवलेला मसाला वापरून पोह्यांचा चिवडा करणार आहोत — जो सुगंधी, टिकाऊ आणि अगदी बाजारात मिळणाऱ्या चिवड्याला तोड देईल!
साहित्य (Ingredients):
चिवडा मसाला साठी:
• धणे – 2टेबलस्पून
• जिरे – 1 टेबलस्पून
• बडिशेप – 1 टीस्पून
• हळद – 1 टीस्पून
• चाटमसाला – 1 टीस्पून
• आमचूर पावडर - 1 टीस्पून
• मीठ – चवीनुसार
चिवडा साठी:
• भाजके पोहे – 500 ग्रॅम
• शेंगदाणे – 1 कप
• डाळे (भाजलेली चणा डाळ) – 1 कप
• कढीपत्ता – 15-20 पाने
• हिरवी मिरची – 2 (बारीक चिरलेली)
• सुकं खोबरं (कापं) – 1 कप
• काजू , बदाम – दोन्ही मिळुन 1 कप (ऐच्छिक)
• तेल – ८ टेबलस्पून
• हळद – 1 टीस्पून
• मीठ – चवीनुसार
• तयार मसाला – चवीप्रमाणे
कृती (Method):
1. मसाला तयार करा:
धणे आणि जिरे मंद आचेवर थोडं भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यात लाल तिखट, साखर, मीठ आणि हळद घालून मिक्सरमध्ये बारीक पूड करा.
हा मसाला हवाबंद डब्यात २ महिने टिकतो.
2. पोहे भाजणे:
जाड पोहे मोठ्या कढईत अगदी मंद आचेवर ५-७ मिनिटं परतून घ्या. ते हलके आणि कुरकुरीत झाले की बाजूला काढून ठेवा.
3. फोडणी तयार करा:
कढईत तेल गरम करा. त्यात शेंगदाणे, काजू, डाळ, खोबरं आणि हिरवी मिरची परतून घ्या. शेवटी कढीपत्ता टाका .
4. मसाला आणि पोहे मिसळा:
आता फोडणीत तयार मसाला घाला. लगेचच पोहे घालून सगळं नीट मिक्स करा .
5. थंड झाल्यावर साठवा:
चिवडा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
सर्व्ह करण्याची टिप:
सकाळच्या चहासोबत, दुपारी भूक लागली की किंवा पाहुणे आल्यावर पटकन सर्व्ह करा.
Chivada , chivda, chivda recipe , masala
Poha chivda recipe in Marathi, masala chivda recipe, chivda recipe, पोह्यांचा चिवडा रेसिपी, मसाला चिवडा, दिवाळी फराळ रेसिपी, crispy poha chivda, easy chivda recipe, homemade chivda, Marathi snack recipes, spicy chivda recipe, khamang poha chivda.
#chivada #chivda #chivdarecipe
#vaishalisrecipe #diwalispecial #crispysnacks #diwali #diwalifaral #masala
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: