*थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त रक्तदानातून मानवता व राष्ट्रीयतेचा संदेश*
Автор: MISSION AKASHZEP INDIAN शाक्य
Загружено: 2020-03-12
Просмотров: 31
Описание:
संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त रक्तदानातून मानवता व राष्ट्रीयतेचा संदेश
प्रतिनिधी: आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान अंतर्गत श्री संत गाडगे महाराज स्मृती स्मारक बहु. सेवा संस्था रामटेक द्वारा दि.२९ फेब्रुवारीला गांधी चौक, रामटेक येथे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा जयंती महोत्सव ऐच्छिक रक्तदान, देहदान, अवयवदान संकल्प नोंदणी, वहीपेनदान, सिकलसेल तपासणी करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, पंचायत समिती सभापती सौ. कलाताई ठाकरे, उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, मुख्याधिकारी स्वरूप खर्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उजगरे, आम्ही भारतीय अभियानाचे संयोजक साक्षोधन कडबे यांनी मार्गदर्शन केले. नगरसेवक प्रभाकर खेडकर, आलोक मानकर, कवीता मुलमुले, संजय मुलमुले, राजेंद्र भोस्कर, बबनजी क्षीरसागर, रत्नमाला अहिरकर, उज्वला धमगाये, रामानंद अडामे, संजय बिसमोगरे, वनमालाताई चौरागडे, पद्माताई ठेंगरे, विवेक तोतडे, जि.प.सदस्य संजय झाडे, विवेक तुरक, बंडू सांगोडे, धीरज राऊत, रजत गजभिये, अरुण भिलकर, गोपी कोल्हेपरा, नितीन बंडीवार, मोनू रघुवंशी, जयेंद्र भिलकर आम्ही भारतीय अभियानचे प्रसिद्धी प्रमुख वैभव तुरक, सदस्य सतीश सुरूसे, वनिता गेडाम ठवरे, पंकज कानेटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मरणोपरांत देहदान संकल्पकर्ता प्रकाश क्षीरसागर, रामटेकचे आगार व्यवस्थापक कन्हैया भोगे व श्री संत गाडगे महाराज स्मृती स्मारक बहु. सेवा संस्था (रक्तदान शिबीर आयोजन), प्रियंका अय्यर, सम्यक गोंडाणे (सिकलसेल तपासणी) कार्यासाठी आम्ही भारतीय अभियान व शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय रक्तपेढीद्वारा शाल व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. नपचे माझी उपाध्यक्ष व नगरसेवक प्रभाकर खेडकर यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी वहीपेनदान केले. श्री संत गाडगे महाराज स्मृती स्मारक बहु.सेवा संस्थाद्वारा गत पाच वर्षांपासून निरंतर गरीबांना निःशुल्क रक्तपुरवठा व १०७ शिबिरांचे आयोजन करून शासकीय रक्तपेढीला ३८९० युनिट उपलब्ध केल्याबद्दल निःस्वार्थ समाजसेवेच्या कार्यासाठी साक्षोधन कडबे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय रक्तपेढी नागपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुकेश वाघमारे, परिचारिका आपूरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रूचिता बरे, प्रणिता, परिचर ज्योती यांनी उत्तमरित्या रक्तसंकलन केले. शिबिरात प्रकाश क्षीरसागर, देवाजी खेडकर, रामदास मोडवर, मारुती वैद्य, आशिष लोखंडे, नविस सांगोडे, सौरभ पद्माकर, अंकित वाघमारे, राजेश चोपकर, अमित खेडकर, राम छत्रे, सुरेंद्र थोटे, नितेश भिमटे, केतन काटकलवार, रोहित क्षीरसागर, अभिजीत थोटे, रवींद्र क्षीरसागर, सुनील लोणकर, प्रशांत किंमतकर, रोहित भिलकर, रोशन चापले, नितीन बंडीवार, उद्देश लबडे, गोपाल बडघरे, संजय पडोळे, योगेश सहारे, जयेंद्र भिलकर, हिमांशू माहुरकर, रमेश पापडकर, योगेश कडव, नितीन बंडीवार यांचेसह ३१ व्यक्तींनी रक्तदानातून मानवता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला तर बहुसंख्य नागरिकांनी सिकलसेल तपासणी केली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच आकाशझेपचे अनिकेत मैंद, मनोज पल्लेवार, राहुल गजभिये, शेखर डाहारे, विनोद खेडकर, भागवत सहारे, रवी क्षीरसागर, अरुण भीलकर, नितेश भिमटे, राजकुमार गजभिये प्रशांत डहारे नितीन बंडीवार, प्रशांत कुंभलकर यांनी परिश्रम घेतले. साक्षोधन कडबे यांनी उपस्थितांचे मनस्वी आभार मानले.
आमच्या चॅनलला अधिकाधिक लाईक,शेअर व सबस्क्राईब करून सहयोग करावे. अधिक जानकारी के लिए 9021409546 इस नंबर पर कॉल करें। जय भारत
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: