*शीर्षक - गणराया* *गीतकार - मधुकर पुर्णाजी तराळे*
Автор: कवितेचे गाणे
Загружено: 2026-01-09
Просмотров: 1083
Описание:
गणराया
कार्यारंभी पुजितो तूजला
गणपती बाप्पा मोरया ||धृ||
पितांबर नेसुनी आपली
मूषका वरूनी आली स्वारी
आमचा उद्धार करण्याआले
गणराज आमचे द्वारी
भक्तीभावे तूज ओवाळूनी नित्य पूजन करूया ||१||
चारभुजा एकदंत
लंबोदर गजवदन
बुध्दीचा देवता तू
शिवगौरी नंदन
दूर्वामोदक आवडी, तुझे सरळ सोंड गणराया || २||
रिद्धीसिद्धी वरातू
तुझ्या भक्तीत होतो दंग
पुष्पमाला अर्पितो तूजला
हाती घेऊनी टाळमृदंग
वंदन करितो तुजला हे विघ्नहर्ता मोरया ||३||
शरण आलो तुला मी
दे आशीष तु मज
तुझीच सेवा घडूदे नित्य
हेच मागणे देवा तूज
नको काही मज आता नको मोह माया ||४||
मधुकर पुर्णाजी तराळे
विरार मुंबई
9970811957
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: