सारेच गुन्हे मी करताना ! पद्मश्री सुरेश वाडकर. ! डॉ. उपेंद्र कोठेकर ! मोरेश्वर निस्ताने
Автор: Upendra kothekar
Загружено: 2025-08-08
Просмотров: 10136
Описание:
जगण्याची त्याच्या साधी नोंदही कुठे न होती
तो बुडून मेला तेव्हा पाण्यावर लकेर नव्हती
सारेच गुन्हे मी करताना मज याद सुळाची होती
जगण्याहून अन्य न कुठली तेव्हा ही शिक्षा नव्हती
सारेच गुन्हे मी करताना....
मी गलोल घेऊन हाती फोडले आरसे जेव्हा
काचेत विखुरली गेली माझीच प्रतिमा होती
जगण्याहून अन्य न कुठली तेव्हा ही शिक्षा नव्हती
सारेच गुन्हे मी करताना....
घनचक्कर जीवन असले माथ्यावर घेऊन खाई
आवर्त युगाचे सरले. आयुष्यचं एक लढाई
जगण्याहून अन्य न कुठली तेव्हा ही शिक्षा नव्हती
सारेच गुन्हे मी करताना....
मी जगलो ज्यांच्यासाठी ते मला समजले परका
दस्तुर असा हा दुनियेचा का मला समजला नाही
जगण्याहून अन्य न कुठली तेव्हा ही शिक्षा नव्हती
सारेच गुन्हे मी करताना...
CREDITS
LYRICS :- DR.UPENDRA KOTHEKAR
SINGER. : PADMASHRI SURESH WADKAR
MUSIC COMPOSER : MORESHWAR NISTANE
MUSIC ARRANGER :-- PUSHKAR DESHMUKH
Musicians;
TABLA :-- DR.DEVENDRA YADAV
FLUTE :-- VIJAY TAMBE
SITAR :-- NASIR KHAN
RECORDED BY :- NITIN KAYARKAR
AAJIVASAN STUDIO MUMBAI
VIDEO EDITOR :-- ANIL KURVADE
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: