पैसे कमावण्यासाठी समलैंगिक संबंध ठेवले, Swargate Case चा आरोपी Datta Gade बद्दल धक्कादायक खुलासे
Автор: BolBhidu
Загружено: 2025-03-01
Просмотров: 379794
Описание:
#BolBhidu #DattaGade #SwargateCrime
स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. गुणाट या त्याच्या मूळ गावातूनच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी त्याला शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पण तरुणीवर अत्याचार करुन तीन दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपी गाडेबाबत त्याच्या वकिलांकडून धक्कादायक दावा करण्यात येतोय. आरोपीनं तरुणीवर जबरदस्तीनं अत्याचार केले नाहीत, त्यांच्यात सहमतीनं संबंध झाले, त्यानं तिला पैसेही दिलेत, असा दावा गाडेच्या वकिलांकडून करण्यात येतोय.
या दाव्यातून अत्याचार प्रकरणाला वेगळा अँगल देऊन गाडेला वाचवण्याचा त्याच्या वकिलांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय. पण गाडेच्या चौकशीतही काही धक्कादायक खुलासे समोर आल्याची माहिती मिळतेय. कुठलाही कामधंदा न करणारा गाडे हा चोरी, लुटमारीसोबतच समलैंगिक संबंधांतूनही पैसे कमावत असल्याचं आता समोर येतंय. तसंच चाकूचा धाक दाखवून त्यानं गावातही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचंही तपासात निष्पन्न झालंय. इतकंच नाही तर आजवर त्याच्याविरोधात दाखल असलेल्या विविध सात गुन्ह्यांबद्दलही सविस्तर माहिती माध्यमांमध्ये देण्यात आलीय. या सगळ्यामुळं दत्तात्रय गाडेची विकृती आणि क्रूरता आता समोर येताना दिसतेय. आरोपी दत्ता गाडेबद्दल तपासात नक्की काय समोर आलं, त्याच्याबद्दल सरकारी वकिलांनी न्यायालयात कोणती माहिती दिली, तेच सांगणारा हा व्हिडिओ
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: