मराठवाडा गीत(Audio)
Автор: Laxmikant Tamboli
Загружено: 2019-04-14
Просмотров: 105351
Описание:
मराठवाडा गीत
--------------------------------------------------------------
या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू
जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ ।।धृ।।
नसता सागर इथे उसळल्या विवेकसिंधूच्या लहरी
शककर्त्यांचे दावीत वैभव प्रतिष्ठान नगरी
देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी ठेवू ।।१।।
घृष्णेश्वर नागेश परळीचा वंद्य वैद्यनाथ
माहूरगडवासिनी रेणुका तिचा मस्तकी हात
तुळजापूरवासिनी भवानी तिचा छबिना मिरवू ।।२।।
तेरढोकीच्या गोरोबाचे अजून फिरते चाक
कष्ट कऱ्यांची माय जनाई तिचा विठ्याला धाक
नाथांच्या समतेची कावड खांदी वाहून नेऊ ।।३।।
नंदीतटीचा हुजूरसाहेब तेगबहादूर बंदा
दासगणुनी जना लाविले भावभक्तीच्या छंदा
भक्ती- पुन्हा एकदा गुढी चला रे उभवू ।।४।।
अजिंठ्याच्या चित्रलिपीचा जगा वाटतो हेवा
कैलासाचे लेणे अमुच्या मर्मबंधीचा ठेवा
मराठवाडी मानध्वजा ही अखंड फडकत ठेवू ।।५।।
-लक्ष्मीकांत तांबोळी
facebook link-
/ laxmikant.s.tamboli
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: