बुवा. सुशिल गोठणकर 💥💥२०२५ || गणपती स्पेशल सुपरहिट गौळण || मला जाऊ दे ना बाजारी ||
Автор: Buva Sushil Gothankarofficials
Загружено: 2025-08-17
Просмотров: 59402
Описание:
#गणपतीस्पेशल#२०२५#गौळण#बुवासुशिलगोठणकर#
अरे कृष्णा...अरे कान्हा....
करू नको रे तू शिरजोरी...
मला जाऊ दे ना बाजारी
मला जाऊ दे ना बाजारी.....||ध्रु||
( दुधाची घागर डोईवरी..निघाल्या गौळणी बाजारी)
तुला सांगू रे मी कितींदा
दह्या दुधाचा आमचा धंदा
तुझ्या रोज रोज च्या त्रासांनं
आता झालाय आमचा वांदा
चितचोरा... रे मुकुंदा
करू नको अशी मस्करी....||१|| मला जाऊ
आंघोळीला आम्ही जाता
तू लपविशी चोळी लुगडी...
हात धरिशी ऐसा घट्ट
माझी तुटून गेली बांगडी....
नंदलाला ...वासुदेवा....
तू थकविशी गोकुळ नगरी....||२|| मला जाऊ
माता यशोदेने त्या तुजला
उखळाशी रे बांधिले
मुख उघडूनी तू तिला
सारं ब्रम्हांड दाविले
प्रेमानंदा.....हे कन्हैय्या....
का रे छळीशी श्री हरी... ||३| मला जाऊ
पाठलाग जरी तू करीशी
आम्हा हवाहवासा वाटे
बासरीच्या मंजुळतेनें
आत्मसुख आम्हा भेटे....
वनमाळी.... गोविंदा...
लोळे सुशील चरणावरी..... ||४| मला जाऊ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: