Baramati | हे बोलतात ना अजित असा,अजित तसा तर ऐका मग आता! दादांनी सगळंच बाहेर काढलं Ajit Pawar Speech
Автор: VIRAL IN INDIA
Загружено: 2024-04-20
Просмотров: 615622
Описание:
भाऊ संभ्रम करत फिरतोय, रोहितला उमेदवारी पवार देत नव्हते, काकी कर्जतला जा म्हणाली;
#Baramati #AjitPawar #SunetraPawar #Supriyasule #Tutari #ncp #indapur #loksabhaelection2024 #rohitpawar #sharadpawar
बारामती : लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. यंदा बारामती लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका सुरु आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब उतरलं आहे, मात्र अजित पवारांसोबत कुणी नाही, असं चित्र दिसून येत आहे. यावर अजित पवार यांनी शरद पवार, युगेंद्र पवार यांच्यासह सर्वांवर निशाणा साधला आहे.
आरोप केल्याने मला भोकं पडत नाहीत
काल पवार साहेबवर बसले होते. पायापाशी सुप्रिया आणि रोहित आणि युगेंद्र बसले होते. साहेब इथे बसले तर मी लांब बसायचं. लोकांना दाखवायचं होतं की कुटुंब एक आहे. काल एक जण उठला. मी खासदार झाल्यावर त्याचा जन्म झाला आणि तो म्हणाला साहेबांनी सगळ्या संस्था काढल्या. मग आम्ही 30-35 वर्ष काय करत होतो? बारामतीत कारखाने कुणी काढले, असा उल्लेख अजित पवारांनी केला आहे. माझ्यावर आरोप केल्याने मला भोकं पडत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सगळं साहेबांनी केलं?
दूध संघ साहेबांनी काढले, केवीकेचे सगळं योगदान आप्पासाहेब पवार यांचे, 91 विद्या प्रतिष्ठानची कोणतीही शाखा काढली नाही. ते सगळं मी केले आणि आमचे चिरंजीव म्हणतात की, सगळे साहेबांनी केलं. तुमचा जन्म पण झाला नव्हता, त्या आधीचे तुम्हाला सगळं कळतं होतं का? 70 हजार कोटी देशाची आणि देवेंद्र फडणवीस आणि आम्ही राज्याची 35 हजार कोटींची माफी केली पण, त्याचा उल्लेख कुणी करत नाही, असंही अजित पवार म्हणाले आहे.
मी गप्प मान खाली घालून बसलोय
धमक्या दिल्या जातात, असं सांगितलं. तुम्ही सगळे बोलत आहेत, मी गप्प मान खाली घालून बसलो आहे. शारदानगर परिसरात काम करणाऱ्या एकीला कामावरून काढलं. कारण त्यांचा मुलगा घड्याळचे काम करीत होता. 89 काही लोकांनी सांगितलं की, अजितला लोकसभेची उमेदवारी द्या, साहेब त्यांना म्हणाले मी जातो शेती करायला.
कचा-कचावरून नोटीस
मी एकटा राजकारणामध्ये होतो बाकी सगळे उद्योग धंदा करीत होते. दोन महिने झाले आहे, धंदापाणी सोडून दिला आहे. आमचे थोरले बंधू (राजेंद्र पवार) लोकांच्यात जातात आणि संभ्रम करतात. मी पद्म सिंह पाटील यांच्याकडून योजना मंजूर करून घेतली. लग्नात पण एक रुपया घेतला नव्हता, घेतला का, असं म्हणत कुणीही भावनिक होऊ नका, असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे. पोकलेनचं थोबाड आणलं की, विहिर कचा-कचा खांदून होते, त्या कचा-कचावरून मला नोटीस आली
रोहित पवार अपक्ष फॉर्म भरणार होते
पायाजवळ बसले होते त्यातील राजेंद्र पवार आले आणि म्हणाले जिल्हा परिषद लढायचं आहे. त्यावेळी साहेबांना मी सांगितले की, रोहितला फॉर्म भरायचा आहे. साहेबांनी सांगितले की, नाही आणि फोन ठेवला. मला एकाने सांगितलं की, रोहितने अपक्ष फॉर्म भरणार होता, त्यांनी फॉर्म देखील आणला होता. मी साहेबांना न सांगता रोहितला फॉर्म दिला परत तो मला म्हणाला मला हडपसरमधून उभे राहायचं. त्याला मी म्हणालो सगळेच एका जिल्ह्यात असं कर्ज जामखेडला जा असं सांगितलं
अजित पवार काय म्हणाले?
मला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, तुम्ही कर्ज जामखेडला जा आणि सुनेत्राला येथून उभं करा. हडपसर मधून चेतन तुपे आहे, त्यावर तो म्हणाला माझ्या सासरा आहे. काही ठिकाणी पोकळी निर्माण झाली तर काहींना आमदारकीचे स्वप्न पडायला लागली. रोहितला निवडून आणलं, साहेब मला बोलले, वरिष्ठांचे बोलणी खावी लागतात. काही जण सांगतात कीस दिल्लीला आम्ही दोघेच नडतो. अरे नडतोय म्हणजे काय मतदारसंघाचे नुकसान होतंय त्याचं काय, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
मोदीसोबत आल्यापासून अदानी-अंबानीसोबत ओळख
पत्रकारांना सांगितलं होतं की, तुम्ही इकडे या मग ते येणारच ना? आणि सांगितलं जातं की अमेरिकेवरून पत्रकार आलेत. मी सुनेला निवडून द्या असे म्हणालो, तर माझ्यावर टीका झाली. मी इकडे आल्यापासून मोदीसोबत ओळख झाली. अदानी-अंबानी सोबत ओळख झाली. पूर्वी आम्ही घास-घास घासायची. ते यायचे आणि यांनी असं केलं त्यांनी तसं केलं सांगायचे, आम्ही राबलेले राहिले बाजूला, अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली
भावनिक होऊ नका, अजित पवारांचं आवाहन
कामाला लागा, याचे दोन अर्थ लागतात की, कामाला लावायचं का कामच करायचं. आज शनिवार आहे, खरं सांगा दोन्ही सभेला गेलेला कोण-कोण आहे? असं अजित पवारांनी विचारताच दोघांनी हात वर केला. भावनिक होऊ नका, काही जण रडतील. मित्र पक्षाला महत्त्व द्यायला, कमीपणा वाटू देऊ नका. आपण कुठल्याही प्रकारे भावनिक होऊ नका. बहुसंख्य मताने आपल्या खासदाराला दिल्लीला पाठवा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : [email protected]
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: