शेंगदाणा चिक्की
Автор: Seema Patil
Загружено: 2025-12-08
Просмотров: 816
Описание:
शेंगदाणा चिक्की#recipe#marathirecipe#trendingshort#viral#@seemapatil23#trend#shorts#winterrecipies
ingredients. दोन वाटी शेंगदाणे
दीड वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ
कृती: प्रथम शेंगदाणे मंद गॅस वरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावे. शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून त्याची डाळ बनवून घ्यावी.
गुळाचा पाक तयार करण्यासाठी बारीक चिरून घेतलेला दीड वाटी गूळ एका पॅनमध्ये घ्यावा त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मंद गॅस वरती दहा मिनिटे सतत हलवत हा पाक बनवून घ्यावा पाक तयार झाला आहे हे समजण्यासाठी एका लहान वाटीमध्ये पाणी घ्यावे व त्यामध्ये एक थेंब गुळाच्या पाकाचा टाकावा तो जर कडकं होत असेल पटकन मोडत असेल तर आपला पाक तयार आहे.
आता या पाकामध्ये आपण सोलून घेतलेले शेंगदाणे चांगले मिक्स करून घ्यावे व एका पोळपाटाला तूप लावून घ्यावे व त्यावरती हे मिश्रण गरम गरम ओतावे व लाटण्याने लाटून घ्यावे व हे गरम असतानाच त्याचे कापही करून घ्यावे व अशा प्रकारे थंड झाल्यानंतर आपल्या वड्या सुटसुटीत निघतात.
तर या पद्धतीने आपली शेंगदाणा चिक्की अगदी घरच्या घरी दोन पदार्थांमध्ये बनवून तयार आहे तर नक्की करून पहा व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: