जबरदस्त मुंबई स्टाईल व्हेज तवा पुलाव बनवायची सोपी पद्धत
Автор: Deliciousfoodsmarathi
Загружено: 2025-12-01
Просмотров: 128
Описание:
रेसिपी
कुकिंग रेसिपीज मराठी #मराठी कुकिंग रेसिपी#महाराष्ट्रीयनरेसिपी #foodie #food
#vlog
#marathivlog
सुपर टेस्टी तवा पुलाव रेसिपी मराठी
तवा पुलाव कसा बनवतात
मराठी रेसिपीज
साहित्य
एक वाटी सेला बासमती तांदूळ
एक शिमला मिरची
एक टोमॅटो
एक कांदा
50 ग्रॅम लाल मिरची
आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या
एक इंच आलं
दोन चमचे तेल
दोन चमचे बटर
एक चमचा हळद
एक चमचा मीठ
अर्धा चमचा आमचूर पावडर
एक चमचा पावभाजी मसाला
कृती
एक वाटी सेला बासमती तांदूळ वीस मिनिटांपर्यंत भिजवून घ्या. नंतर एक लिटर पाण्यामध्ये वीस मिनिटापर्यंत उकळून घ्या. उकळलेला तांदूळ चाळणीने गाळून घ्या त्यामधलं पाणी काढून घ्या. तांदूळ पूर्णपणे थंड करून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात पन्नास ग्रॅम गरम पाण्यात भिजलेल्या लाल मिरच्या काढून घ्या. त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घालून छान पैकी चटणी दळून घ्या. नंतर तव्यावर दोन चमचे तेल आणि दोन चमचे बटर घाला. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घाला. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घाला आणि तीन ते चार मिनिटापर्यंत परतून घ्या. नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची, एक बारीक चिरलेला टोमॅटो, पाव वाटी उकडलेले मटार, एक उकडलेला बटाटा घाला. दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून घ्या. नंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे लाल मिरचीची पेस्ट घाला. मिक्स करून घ्या. आता थंड केलेल्या राईस तव्यावर घाला आणि छान पैकी परतून घ्या. चटपटीत तवा पुलाव तयार.
मराठी टिफिन रेसिपी
मराठी लंच बॉक्स रेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: