कवठेगुलंद ते शिवपुरी-अक्कलकोट पदयात्रा २०२३-सुवर्ण महोत्सवी वर्ष (भाग १): काणे बुवा : श्रीसंकेत काणे
Автор: इदं न मम
Загружено: 2023-07-02
Просмотров: 698
Описание:
दिनांक १२ जून २०२३. पदयात्रा निघण्याचा दिवस. त्यात या वर्षीच्या पदयात्रेच एक वैशिष्ठ्य म्हणजे ही पदयात्रा ५०वी म्हणजेच या वर्षी या पदयात्रेचा सुवर्णमहोत्सव साजरा करायचा होता आणि त्या माध्यमातून माझ्यासह सर्वांच्या मनाला उभारी देण्यासाठी हे आवश्यक होतं. वास्तविक पाहता गेल्या दोन तीन वर्षात ज्या काही घटना घडल्या होत्या त्या मुळे सुरुवातीला मनात खूप साशंकता होती ही गोष्ट करणं हे माझ्यासारख्या नवख्या मुलाला जमेल का? याचे परिणाम काय होतील? असे एक नाही असंख्य प्रश्न मनाला पडत होते. पण मागच्या वर्षी प्रायोगिक तत्वावर आम्ही मोजकीच माणसे जाऊन ती ४९ वी पदयात्रा पार पडली. आणि आश्चर्यकारकरित्या प्रत्येक ठिकाणी आमचे स्वागतच झाले. नाना आणि आज्जी आपल्यात नसले तरी त्यांचीच पुण्याई इथे कामाला आली होती. सोबत परमसद्गगुरु श्री गजानन महाराज यांचे कृपाशीर्वाद होतेच.
त्या नंतर चालू झाली सुवर्ण महोत्सवी वर्षाची तयारी. परिस्थिती नुसार काही बदल करणे गरजेचे होते. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या सर्वांसमोर पदयात्रेचे वेळापत्रक आणले. आता खरी तयारी सुरू झाली. सोबत विनय केळकर (विनय दादा) यांचे उत्तम नियोजन आणि नवनवीन कल्पनांचा वापर करुन तयारी सुरू झाली. प्रवासाचा टेम्पो ठरला. त्याचे बोर्ड/ बॅनर तयार झाले. या वर्षी प्रत्येक पदयात्रिकाला ओळखपत्र देण्याचे ठरले. त्याची तयारी झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकाला आठवणीत राहण्यासाठी प्रत्येकाला स्मृतिचिन्हे द्यायची ठरली. ती सुध्दा तयारी झाली. आता प्रश्न राहिला पादुकांच्या वाहनाचा. कारण मागच्या वर्षी पासून पालखीचा गाडा बंद करावा लागला होता त्या मुळे हा प्रश्न उभा होणारच होता पण तो प्रश्नही लगेच सुटला. कोल्हापूर चे श्री. भालचंद्र कडेकर यांनी आपली कार या साठी लगेच उपलब्ध करुन दिली. सोबत श्री. एकनाथ सहस्त्रबुद्धे ऊर्फ एकानारायण यांनी वेळोवेळी मोलाचे सल्ले दिले आणि या मुळे आज ही पदयात्रा सुवर्ण महोत्सवी पदयात्रा पार पडली.
या वेळी श्री वारंवार परीक्षा बघत होते पण मला पहिल्यांदाच माझे ध्येय स्पष्ट दिसत होतं आणि त्या मुळे मी एकदम शांत राहिलो. आणि आता असं वाटतंय की मी या वर्षी च्या परीक्षेत पास झालो. कारण मी नानांच्या आदर्शांवर चालत होतो. ही वाट सोपी नाही खूप अवघड आहे दिसत होतं पण त्यांची निष्ठा अंगी आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करुन प्रवास करण्याचा एक प्रयत्न केला आणि श्रीकृपेने मी कृतकृत्य झालो हे नक्की.
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दि.१२ जून म्हणजे पदयात्रेच्या पहिल्या दिवशीचा प्रवास या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्यासमोर आणतोय. कवठे गुलंद मधील ग्रामस्थ वारकरी मंडळींच्या सहकार्याने एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. तो प्रवास आज आपल्यासमोर मुद्दाम हून आणतोय.
या निमित्ताने श्रींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की हा वसा ही परंपरा चालवण्याची शक्ती द्या.... शक्ती द्या.... शक्ती द्या.....
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
परम सदगुरू श्री गजानन महाराज की जय 🙏
सत्य सनातन धर्म की जय 🙏
चि. 'श्री'संकेत भार्गव काणे
/ kanebuwasmruti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: