किल्ला क्रमांक : 16 🚩 किल्ले रोहिडा - विचित्रगड - बिनीचा किल्ला - भोर - पुणे 🚩 Rohida Gad , Pune🚩
Автор: इतिहास महाराष्ट्राचा गड किल्यांचा
Загружено: 2019-07-18
Просмотров: 2836
Описание:
गडावर पोहोचण्याच्या वाटा :
1) बाजारवाडी मार्गे :-
भोरच्या दक्षिणेस ८ – १० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहोचण्यास एक तास लागतो.
2) अंबवडे मार्गे :-
भोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पुणे – भोर – पानवळ – अंबवडे अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास लागतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वराकडे जाण्यास सोपे जाते.
3) रोहिडा ते रायरेश्वर वाटा :-
1) भोर – कारी बसने कारी गावात उतरावे. तिथून लोहदरा मार्गे २ तासांत रायरेश्वर पठाराकडे पोहोचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो.
2) वडतुंबी मार्गे दुपारची (2.45) भोर – टिटेघर गाडी आंबवण्यास येते, तिने वडतुंबी फाट्यावर उतरावे. तिथून 15 मिनिटांत वडतुंबी गाव गाठणे. येथून साधारणत… 2 तासात गणेशदरा मार्गे रायरेश्वर पठारावर पोहोचता येते.
3) भोर – कोर्ले गाडीने कोर्ले गावात उतरावे. रात्री उशीर झाल्यास गावात मुक्काम करून पहाटे गायदरा मार्गाने 3 तासात रायरेश्वर पठारावरील देवळात जाता येते.
4) भोर – दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरावे व तिथून धानवली पर्यंत चालत जावे. पुढे वाघदरामार्गे 3 तासात रायरेश्वर गाठता येते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इतिहास महाराष्ट्राचा - गड किल्ल्यांचा या मराठी चॅनेल साठी विशेष सहकार्य :-
@ ध्वनिमुद्रण निलेश मंचरकर अहमदनगर : 9850568556 .
@ ध्वनिमुद्रण दिपक बांदल : 9221123742
@ संकल्पना - विडिओ एडिटिंग शरद : 9619324716 .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर माहिती आम्ही विविध पुस्तके, शिवचरित्र, शिवभक्त, फेसबुक, गुगल, सोशल मीडिया वरुन मिळवली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: