Deep Amavasya म्हणजे काय? |आषाढी अमावस्या 2022 ।
Автор: Story Shayari
Загружено: 2022-07-27
Просмотров: 309
Описание:
Deep Amavasya म्हणजे काय? |
आषाढी अमवस्या हा आषाढातील शेवटचा दिवस याला दीप अमावस्या(deep amavasya) असे म्हणतात.आपल्या संस्कृती मधे ,आपल्या परंपरेमधे, दिव्याचा किंवा दिपाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. मानवजातीला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा प्रेरणादायी व सकारात्मक उर्जेचा स्त्रोत मानला जातो.त्यातून निर्माण होणा-या किरणांमधेही आपल्यातल्या सगळ्या हीन प्रवृत्तींचा,आपल्या दुःखांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे.
आपल्याकडे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडा-पिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्ज्वलित करून त्यांची पूजा करावी, अशी मान्यता आहे.कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने केली जाते. दिवा सत्कर्माचा साक्षीदार होत असतो. अगदी प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे. आजही आपण आपल्या कुठल्याही वाढदिवसाला आपल्या प्रिय व्यक्तीला ह्याच दिव्याने ओवाळतो. पुर्वी कुठल्याही मोठ्या कामगिरीवर निघताना किंवा मोठा विजय मिळवून घरी परत आलेल्या वीरालादेखील दिव्याने ओवाळले जायचे..एवढच काय तर आपण आपल्या घरातील लहान मुलाला सुद्द्धा कुलदीपक, वंशाचा दिवा असेच विशेषणं वापरतो..
अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते.
#shorts #storyshayari #marathiculture
#deepamavasya
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: