गहू लागवड सविस्तर माहिती Wheat cultivation wheat farming
Автор: SAHYADRI AGRO / सह्याद्री ॲग्रो
Загружено: 2023-11-17
Просмотров: 251
Описание:
गहू लागवड सविस्तर माहिती
रब्बी हंगामातील महत्त्वाचे पिक गहू हे एकदल धान्य आहे आणि याचे पीठ करून पोळ्या, ब्रेड इत्यादी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. गव्हांकुराचा रस हा पौष्टिक असतो. गहू पिकावरील संशोधन केंद्र करनाल हरियाणा येथे आहे. भारतात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन पंजाब व मध्यप्रदेश या राज्यांत होते.
भारत गहू लागवड क्षेत्राच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर रशिया हे देश आहेत. पंजाब व हरियाना या राज्यांची गव्हाची उत्पादकता महाराष्ट्रापेक्षा तिपटीने जास्त आहे.
आज आपन या विडिओ मध्ये गहु पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी माहीती पाहणार आहोत हा विडिओ पुर्ण पहा या मध्ये दिलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.
१) जमीन :- गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते.
२) हवामान :- गहू पिक थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामानात चांगले उत्पादन देते.
पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते.
दाणे भरण्याच्या वेळी २५ डिग्री सेल्सियस उपयुक्त ठरते व दाण्याची वाढ चांगली होऊन त्याचे वजन वाढते.
३) पूर्वमशागत :- खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची १५ ते २० सेंमी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी.
शेवटच्या कुळवणी आधी हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे.
पूर्वीच्या पिकांच धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
४) पेरणीची वेळ :- जिरायत गव्हाची पेरणी आक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
बागायत उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी.
बागायती गव्हाची पेरणी १९ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन प्रत्येकी हेक्टरी २.५ क्विंटलने घटते.
५) पेरणी पद्धत :- गव्हाच्या जिरायती आणि बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन ओळींत २२.५ सेंमी. आणि बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सेंमी. खोल करावी.
६) हेक्टरी बियाणे :-
a) जिरायत पेरणी :- ७५ ते १०० किलो
b) बागायत वेळेवर पेरणी :- १०० किलो
c) बागायत उशिरा पेरणी :- १२५ ते १५० किलो
७) बीजप्रक्रिया :- पेरणीपूर्वी बियाणास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी, तसेच प्रति १० किलो बियाण्यासाठी ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.
८) खत व्यवस्थापन :-
अ) जिरायत पेरणी :- ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीवेळी द्यावे.
ब) बागायत वेळेवर पेरणी :- ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळी व ६० किलो नत्र प्रतिहेक्टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.
क) बागायत उशिरा पेरणी :- प्रत्येकी ४० किलो नत्र स्फुरद व पालाश प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळी व ४० किलो नत्र प्रतिहेक्टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.
९) पाणी व्यवस्थापन :-
अ) मध्यम ते भारी जमिनीत पेरणीनंतर २१ दिवसांच्या अंतराने गहू पिकास खालील संवेदनक्षम अवस्थेत पाणी द्यावे.
A) मुकुट व मुळे फुटण्याची अवस्था :- १८-२१ दिवसांनी
B) कांडी धरण्याची अवस्था :- ४० ते ४२ दिवसांनी
C) फुलोरा येण्याची अवस्था :- ६५-७० दिवसांनी
D) दाणे भरण्याची अवस्था :- ८० ते ८५ दिवसांनी
ब) अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीतील सिंचन :-
A) एकच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
B) दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी व दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
C) तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
१०) आंतरमशागत :-
a) जरूरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी.
b) गव्हामधील रूंद पानाच्या तणांच्या नियंत्रणासाठी तणे दोन ते तीन पानांच्या अवस्थेत आल्यावर मेटसल्फ्युरॉन मिथाईल (२० टक्के) हेक्टरी २० ग्रॅम प्रति ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
११) कापणी व मळणी :-
गव्हाच्या काही जातींचे दाणे पीक पक्व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
१२) उत्पादन क्षमता :-
सुधारित वाणांची उत्पादन क्षमता हेक्टरी ४० ते ५० क्विंटल मिळू शकेल.
Disclaimer:
The content on this channel is for general information purposes only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. We do not guarantee accuracy or reliability. Any reliance on the information is at your own risk. We are not responsible for external links or their content. Content may change without notice.
In no event will we be liable for any loss or damage, including without limitation, indirect or consequential loss or damage, or any loss or damage whatsoever arising from loss of data or profits arising out of, or in connection with, the use of this YouTube channel.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: