दहावी मराठी (गद्य) अनंतशक्ति परमेश्वरू / हत्तीचा दृष्टांत / केसोबास
Автор: ज्ञानभाषा मराठी
Загружено: 2020-06-27
Просмотров: 2580
Описание:
अधिक माहितीसाठी लिंक - • विषय मराठी महानुभव पंथ
अधिक माहितीसाठी लिंक- • नववी मराठी (गद्य) गुरख्याचे नेत्रपतन ( म...
केसोबास हे महानुभाव पंथातील ज्येष्ठ ग्रंथकार व संस्कृत पंडित होते. मानभाव पंथातील दुसरे आचार्य नागदेवाचार्य यांचे ते पट्टशिष्य होते .त्यांच्या सूचनेवरूनच केसोबासांनी मराठीत ग्रंथरचना केली. त्यांच्या साहित्याने महानुभाव पंथाचे तात्विक अधिष्ठान दृढ बनले व महानुभाव साहित्यात मोलाची भर पडली." लिळाचरित्र" हा मराठी साहित्यातील पहिला गद्यग्रंथ होय. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लीळाचरित्रात दृष्टांत कथेच्या रूपात जो उपदेश केला .त्या दृष्टांतांचे संकलन केसोबासांनी 1285 च्या सुमारास दृष्टांतपाठ या ग्रंथात केले.
त्यातीलच हत्तीचा दृष्टांत येथे दिला आहे . यामध्ये परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन, ताकद सर्वसामान्यांना समजत नाही .याचे वर्णन करण्यासाठी आंधळे व हत्ती यांचा दृष्टांत दिला असून सामान्य माणूस आपल्या अनुभवानुसार ,ज्ञानानुसार एखाद्या गोष्टीचा विचार करतो परंतु ते अंतिम सत्य नाही .सर्व शक्ती युक्त परमेश्वर असून कोणत्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान असावे असा बोध या पाठात मिळतो.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: