SHORT NEWS 20 | पुरामुळे सोलापूर - पुणे महामार्ग बंद होण्याच्या मार्गावर..? Solapur Pune Highway
Автор: Yes News Marathi
Загружено: 2025-09-23
Просмотров: 104567
Описание:
SHORT NEWS 20 | पुरामुळे सोलापूर - पुणे महामार्ग बंद होण्याच्या मार्गावर..? Solapur Pune Highway
#solapurNews #yesnewsmarathi #solapur #shortnews20 #yesnewsmarathi #solapurNews #solapur #सोलापूरपाऊस #SolapurRain #पावसाळीसोलापूर #SolapurWeather #SolapurPuneHighway
#MonsoonVibes #RainInSolapur #SolapurUpdates
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
सीना नदीच्या पात्रातून 50 हजार क्युसेक वेगाने पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे मात्र या नदीपात्रात आज दिवसभर दोन लाख 12 हजार क्युसेक एवढ्या प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्यामुळे सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी ब्रीज वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. आज दुपारी अडीच वाजल्यापासून लांबोटी पुलावरून एकेरी वाहतूक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या ठिकाणी पहाणी करून पोलिसांना तसेच महामार्ग विभागाला विविध सूचना दिल्या. मोहोळ माढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सीना नदी काठ पाण्याने पूर्णपणे व्यापला असून हजारो लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या टीमकडून मदत कार्य सुरू आहे. अनेक गावांना जोडणारी रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावचा संपर्क तसेच दळणवळण बंद झाले आहे. सोलापूर सांगली या महामार्गावर सीना नदीवर तिर्हे येथे असलेल्या नवीन पुलावरून महापूर पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली आहे. इथला जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे तर हत्तुर येथे देखील महामार्ग लगत पाणी आले आहे. इथेही इथे देखील एकही वाहतूक करण्यात आली आहे. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच सीना नदीला भयानक पूर आल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र आणि शेकडो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
आर्मीच्या हेलिकॉप्टरने माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांना एयरलिफ्टिंग द्वारे काढण्यात आले बाहेर.. तर आणखी जवळपास 20 नागरिक अडकलेले असून त्यांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्याची प्रयत्न सुरू
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी; जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या प्रशासनास दिल्या सूचना
उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी येथे पुरात अडकलेल्या अनेक लोकांना बचाव पथकाने सुरक्षित स्थळी हलविले
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर,दक्षिण सोलापूर, मोहोळ या सीना नदी परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रेस्क्यू सुरु
खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरतील मोहोळच्या पूरग्रस्त भागाची केली पाहणी.. आणि म्हणाल्या सरकारनं ओला दुष्कळा जाहीर करावा
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती...शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता
उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव आसबे वस्ती येथील वीस नागरिकांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले
आमदार तानाजी सावंतांचा बंगला पुराच्या विळख्यात: फॉर्च्युनर गाड्या, ट्रॅक्टर बुडाले; घरातील सदस्यांची बोटीने सुटका
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]
★★★Watch our channel's popular playlists★★★
Advt
• नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: