SHRI SWAMI SAMARTH MATH HADPID DEVGAD श्री स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड/VLOG 1
Автор: AARADHYA AMAN DALVI
Загружено: 2021-04-08
Просмотров: 1457
Описание:
देवगड पासून साधारण २५ कि. मी आणि मुंबई - गोवा महामार्ग NH66 नांदगाव तिठा येथून देवगड निपाणी स्टेट हायवेवर साधारणतः १५ कि. मी वर हडपिड हे गाव आणि ह्या गावातच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्वात सुरेख, भव्य आणि कोकणाची वास्तुकला समृध्द करणारे श्री स्वामी समर्थांचे मठ निर्माण करण्यात आले आहे, डोळ्यांचे पारणे फेडणारी ही वास्तू आणि परिसर आपल्याला मोहून टाकतो, मुख्य प्रवेशद्वाराची रेखीव कमान भाविकांना मठात येण्यास साद घालते, २५ एक पायऱ्या चढून मुख्य मंदिर नजरेस पडते आणि मंदिर द्वारावर प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमानाची सुंदर मूर्ती पाहतच आपण मठात प्रवेश करून थेट सभा मंडपात येतो आणि आपसूक समोर प्रसन्न मुद्रेत असणाऱ्या स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्ती पुढे आपण नतमस्तक होतो, मूर्तीतील जिवंत पणा याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आणि आम्ही धन्य जाहलो, स्वामींचे जप करत आपण ह्या शांत आणि रेखीव सभामंडपात कित्येक तास ध्यानस्थ बसू शकतो, प्रदक्षिणा मार्ग तर अप्रतिमच, सर्व स्वामी भक्तांनी नक्कीच ह्या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनास यावे, सदर व्हिडिओ मी ( आराध्य अमन दळवी) आणि माझे बाबा ( अमन चंद्रकांत दळवी ) यांनी fb वर live शूट करून पोस्ट केलेला आहे.
धन्यवाद!
like share and subscribe
Moving towards 1000 subscribers
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: