श्री.ह.भ.प. समाधान महाराज शर्मा । प्रकट दिन यात्रा महोत्सव कोलारा
Автор: माऊली हरिपाठ मंडळ कोलारा - Mauli Haripath Mandal
Загружено: 2025-12-01
Просмотров: 1296
Описание:
श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान कोलारा हे क्षेत्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये आहे. कोलारा हे गाव चिखली मेहकर या हायवेवर चिखली पासून दहा किलोमीटर दक्षिणेस आहे.
मंदिराचा इतिहास:
सुमारे बाराव्या - तेराव्या शतकात म्हणजेच शेकडो वर्षापूर्वी श्रीक्षेत्र काशी येथून काळभैरवाची मूर्ती कोलारा च्या बाजूला असलेले रोहडा गावी बैलगाडी वरून नेत असताना त्या बैलगाडीचा चाकाचा आस मोडला. त्यानंतर रोहडा या गावकऱ्यांनी मूर्ती नेण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर तेथे एक आकाशवाणी झाली व असे ऐकण्यात आले की कालभैरवांना ही जागा पसंत पडली आहे व ही जागा निश्चित केली आहे. त्यानंतर कोलारा मध्ये काळभैरवाची स्थापना झाली. नंतरच्या काही वर्षात गावकऱ्यांना अनेक चमत्कार झाले म्हणून काळभैरव यांचे श्री सिद्धेश्वर महाराज हे नाव प्रसिद्ध झाले.
माऊली हरिपाठ मंडळ कोलारा:
माऊली हरिपाठ मंडळ हे कोलारा या गावांमधील एक भजनी मंडळ आहे. हे भजनी मंडळ भजन व कीर्तन यास आपली सेवा देतात. तसेच दिंडी उत्सव किंवा इतर काही उत्सव असेल तर त्यांना आपली उपस्थिती दर्शवतात. या भजनी मंडळामध्ये अनेक लहान मुले सुद्धा आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: