SHORT NEWS 20 | स्वीकृत नगरसेवकाबाबत भाजपाचा फंडा उद्या मनपा बोर्डात उघड होणार
Автор: Yes News Marathi
Загружено: 2026-02-19
Просмотров: 1446
Описание:
SHORT NEWS 20 | स्वीकृत नगरसेवकाबाबत भाजपाचा फंडा उद्या मनपा बोर्डात उघड होणार
#Solapur #SolapurMahapalika #AcceptedCorporators #BJP #MIM #VinayakKondyal #NarendraKale #WaheedaShaikh #ChandrakantPatil #SolapurPolitics #BreakingNews
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
सोलापूर महापालिकेच्या दहा स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी आयुक्त कार्यालयाकडे एकूण 62 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपच्या नऊ जागांसाठी 59 जणांचे तर एम आय एम कडून एका जागेसाठी तिघांचे अर्ज आहेत. एमआयएम कडून नईम सालार यांचे नाव फिक्स झाले आहे. भाजपचा फंडा अद्याप अनेकांना कळला नसल्यामुळे ज्यांनी अर्ज दाखल केले ते गॅसवर आहे. सोलापूर शहरातील तीनही आमदारांच्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. उद्या सकाळी महापालिकेची अकरा वाजता सभा सुरू होईल. सुरुवातीला भाजप गटनेते नरेंद्र काळे हे त्यांच्याकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या 9 नगरसेवकांच्या नावांची यादी महापौरांकडे देतील. तर एम आय एम चे गटनेते वाहिदा शेख हे त्यांच्याकडून एका नगरसेवकाचे नाव महापौरांकडे देतील आणि महापौर 10 स्वीकृत नगरसेवकांची सभागृहात घोषणा करतील. तसेच याच सभेत स्थायी समितीवरील नऊ नगरसेवकांची आणि परिवहन समितीच्या 12 सदस्यांची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सभेकडे शहराचे विशेष लक्ष लागले आहे. कोल्हापूर पॅटर्न प्रमाणेच सोलापूर महापालिकेत देखील सव्वा सव्वा वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक निवडण्याबाबत आज शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची चर्चा झाली. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांना पाच वर्षाचा,अडीच वर्षाचा की सव्वा वर्षाचा कालावधी मिळणार हे उद्याच कळणार आहे.
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]
★★★Watch our channel's popular playlists★★★
Advt
• नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: