आठवला तो झोका लहानपणीचा/आणि अगदी त्या आठवणीत झोका मागे पुढे करत झोक्यात सर्व हरवून गेले अर्चना सुतार
Автор: गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या
Загружено: 2025-03-06
Просмотров: 36
Описание:
खालील लेख आवर्जून वाचा 👇 👇 👇 👇 गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चैनल वर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. शआपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.आणि झोक्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक,कमेंट आणि शेअर करा.
मित्रहो अगदी लहानपणी झाडाला झोका बांधून आणि कधी कधी तर घरातले लोक बाहेर गेले की सुट्टीच्या दिवशी आम्ही मित्र-मैत्रिणी गोठ्यातील दोन खांबांना दोरी बांधून एकमेकाला झोका देत झोका घेण्याचा आनंद अगदी हिरिरीने घेत होतो.
आणि जसे जसे मोठे होईल तसे हरवत गेलेले बालपण त्या बालपणातील निरागसता बालिशपणा कुठच्या कुठे विसरून गेला आणि जीवनाच्या पुढील वाटचालीकडे वळताना अलगद बालपणही कुठच्या कुठे विसरून गेले. आणि मला वाटते आपल्या सर्वांच्या बाबतीतच असंच काहीतरी आहे मला वाटत नाही की कोणी यामध्ये अपवाद असेल.
परंतु मित्रहो,काळाच्या ओघात कितीही बदल होत गेले तरी पण किंवा कितीही वय वाढत गेले तरी बालपण विसरता कामा नये आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणतीच गोष्ट पुन्हा पुन्हा होत नाही या जगात सर्वच गोष्टी एकदाच अनुभवायला मिळतात मग त्यामधील कोणतेही क्षण असो ते पुन्हा आयुष्यात मागितले तरी मिळत नाहीत. मी तर म्हणेन कोणीतरी म्हणले आहे ते बरोबरच आहे मोजू नयेत वय आणि तारखा आणि जन्म असावा फुलपाखरासारखा अगदी असंच माणसाने अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत बालपण अंगीकारावे.
इथे वयाची कोणतीच अट नसावी. नाहीतरी आपणा सर्वांना माहीतच आहे की व्यायामाशिवाय आपले शरीरही सुंदर राहत नाही. तसही मी माझ्या कवितेतून म्हणते की आरोग्य चांगले तर दुनिया मस्त वाटते.व्याधींनी ग्रसलेले शरीर नको वाटते.
कारण शरीर जर चांगले नसेल तर काहीच आपल्या जीवनाचा उपयोग नाही शरीर ही खरं तर ईश्वराने दिलेली आपल्याला खरी संपत्ती आहे. आणि ती जपता येणे अगदी अत्यंत महत्त्वाचे आहे.
म्हणूनच एकच आपणास आवर्जून इथे मी सांगेन की नक्कीच आपणही अशा कोणत्याही वयात असाल तरी आपले जन्मजात आपल्याला मिळालेले खेळाचे सानिध्य अगदी जवळीकता कायमच आपण न विसरता स्वीकारले पाहिजे. चला तर मग तुम्ही पण झोका खेळाल ना मग आता ?
वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर कवयित्री अर्चना सुतार.पाचवड.लिखीत लेख
धन्यवाद.......
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: