ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

फणसाड अभयारण्य (अलिबाग) कोकण, संपूर्ण माहिती - निवास, जेवण व फिरण

Автор: Pragat Loke

Загружено: 2019-08-21

Просмотров: 43924

Описание: फणसाड अभयारण्य (अलिबाग) कोकण, संपूर्ण माहिती - रहाण, जेवण व फिरण
For Latest Update Follow me on INSTAGRAM:   / pragat.loke  
ganesh krupa rest house (Phansad) 9270616596/9270221966
Phansad Wildlife Sanctuary, Phansad Bird Sanctuary
फणसाड अभयारण्य हे महाराष्ट्रामधील अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात १९८६ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौ. कि. मी. आहे फणसाडमध्ये अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, निलगिरी आणि सावर असे सुमारे ७०० प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे प्राणी आणि ९०हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरे आहेत. अभयारण्यात चिखलगाण, धरणगाण फणसाडगाण आदी ३० पाणस्थळे आहेत. अभयारण्याच्या जवळच अलिबाग-मुरुड रोडवरील बोर्ली येथून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेला फणसाड धबधबा आहे.

नेहमीच्या वृक्षांबरोबरच फणसाड येथे अशोक, कुरडू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारख्या औषधी वनस्पती आहेत. गारंबीच्या वेली हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे.या वेलीची लांबी १०० मीटरहून अधिक असते. वेलींच्या शेंगांमधील गर येथील शेकरूंना खूप आवडतो.

महराष्ट्र राज्य शासनाने राज्य फुलपाखराचा मान दिलेले ब्लू मॉर्मॉन फुलपाखरू फणसाडमध्ये मोठ्या संखेत दिसते. महाराष्ट्राचे आणखी एक मानचिन्ह असलेले शेकरू येथे आहेत. याशिवाय कोल्हा, तरस, पिसोरी, बिबट्या, भेकर, माकड, मुंगूस, रानमांजर, रानससा, वानर, सांबर, साळिंदर आदी प्राणीही आहेत. बिबट्याचे हमखास दर्श येथे घडते. घोणस, नाग, फुरसे, मण्यार आदी विषारी आणि तस्कर, हरणटोळसारखे बिनविषारी साप या अभयारण्यात आहेत. धनेश पक्षी हा या अभयारण्यात हमखास दिसतो.
सुपेगाव वनविभागाचे व्हाईट हाऊस तंबू रहाण्यासाठी मिळतात. शिवाय खासगी निवास व्यवस्थाही आहे. बचत गटाच्या महिलांच्या हातचे जेवण येथे उपलब्ध आहे.
कोकणाला 720 किमी चा अथांग निळाशार समुद्र किनारा लाभला आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील सागर किनाऱ्यावरील मुरुड-जंजिरा पर्यटनासाठी सुप्रसिद्ध आहे. मुरुडच्या अलीकडे असलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील पर्यटक व पक्षीप्रेमी येथील निसर्ग सौंदर्य वनसंपदा व वन्यजीव, प्राणी व पक्षी यांच्या सान्निध्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर भेट देत असतात.

मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर व मुरुडच्यामध्ये 55 चौ.कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेल्या ह्या अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानाचे राखीव शिकार क्षेत्र होते. संस्थानाचे नवाब सिद्धी यांच्या मालकीचे शिकार स्थळ म्हणून सदर जंगलाचा वापर होत असे. या ठिकाणच्या जैवविविधतेचे संरक्षण व्हावे व निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. जंगल संरक्षण, वन्यजीवांचे संवर्धन व व्यवस्थापन यासाठी पुढे हे अभयारण्य वन विभाग अलीबाग यांचेकडून वन्य जीवन विभाग ठाणे, यांचेकडे सन 1994 मध्ये हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर या अभयारण्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला.

शुष्क पानगळीची वने, सदाहरित वने, मिश्र सदाहरित वने व नदीकाठची वने अशा या वैविध्यपूर्ण जंगलात सुमारे 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात. पश्चिम घाटाअंतर्गत येणाऱ्या या भूप्रदेशाचे उष्णकटीबंधीय हवामान असून तापमान किमान 25 ते कमाल 35 अंश सेल्सीयस इतके असते. सरासरी 2800 मिलीमीटर पावसाची नोंद येथे घेण्यात आली आहे.
पर्यटकांच्या व अभ्यासकांच्या वास्तव्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग, ठाणे मार्फत येथे तंबू व व्हाईटहाऊस नामक स्वच्छ गेस्टहाऊसमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. आवारात सुरुवातीसच असलेल्या भागात उभारलेल्या प्रत्येक तंबूमध्ये 6 ते 8 माणसे आरामात राहू शकतात. यासाठी लागणाऱ्या सर्व मुलभूत सुविधांनी हे तंबू व गेस्टहाऊस परिपूर्ण आहेत. ग्राम परिस्थितीकीय विकास योजनेअंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून खास घरगुती चवीच्या भोजनाचा आस्वाद येथे घेता येतो. अभयारण्यातील प्रवेश वाहनव्यवस्थेसाठी शासकीय नियमाप्रमाणे ठराविक शुल्क आकारले जाते.

महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिकच्या वापरास येथे सक्त मनाई असल्याने परिसराची स्वच्छता, अंतर व माहिती यांचे सूचना फलक उभारुन वन्यजीवांच्या अधिवासाला धोका वा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते. स्थानिक माहितीपूर्ण निसर्ग परिचय केंद्रही येथे आपल्या ज्ञानात भर घालते. समुद्रकिनाऱ्यालगत हिरव्यागर्द झाडीतील निसर्गाच्या परीसस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपले मन:पूर्वक स्वागत फणसाड वन्यजीव अभयारण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले ‘शेकरु’ येथे हमखास दृष्टीस पडते.

महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेला हा झुबकेदार शेपटीचा प्राणी उंच झाडांवर आढळतो. याची घरटी वैशिष्ट्यपूर्ण असतात. शेकरु विशिष्ट अशा शिळेप्रमाणे आवाज करतो. सकाळी व सायंकाळी त्याचे दर्शन घडते. कोवळ्या उन्हात याच्या हालचाली मोहक असतात. येथील उल्लेखनीय पिसोरी हे जगातील सर्वात लहान हरीण म्हणून ओळखले जाते. या प्राण्यांची उंची सुमारे 6 इंचापासून 1 फुटापर्यंत असते. ‘पिसोरी’ अतिशय चपळ असतात. कमी उताराच्या भागात याचा प्रामुख्याने आढळ असतो.

याबरोबर नाग, फुरस, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, तस्कर यासारखे अनेक बिनविषारी साप येथे आढळतात. अजगर व घोरपड

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
फणसाड अभयारण्य (अलिबाग) कोकण, संपूर्ण माहिती - निवास, जेवण व फिरण

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Корабли во Льдах : Снежные Бури и Гигантские Волны

Корабли во Льдах : Снежные Бури и Гигантские Волны

गारवा ऍग्रो टुरिझम आबलोली | Garva Agrotourism & Birding | Konkan Village Food | Birding In Kokan

गारवा ऍग्रो टुरिझम आबलोली | Garva Agrotourism & Birding | Konkan Village Food | Birding In Kokan

तांबळडेग पर्यटन (कोकण) - समुद्रकिनारा, नदी, संगम, कासव फेस्टिवल, वॉटर स्पोर्ट्स, रेस्टॉरंट & हॉटेल

तांबळडेग पर्यटन (कोकण) - समुद्रकिनारा, नदी, संगम, कासव फेस्टिवल, वॉटर स्पोर्ट्स, रेस्टॉरंट & हॉटेल

Иран. Адская война вместо блицкрига

Иран. Адская война вместо блицкрига

Новости Сегодня 03.03.2026 - ЧП, Катаклизмы, События Дня Москва, Таиланд Индия США Европа

Новости Сегодня 03.03.2026 - ЧП, Катаклизмы, События Дня Москва, Таиланд Индия США Европа

Умирающие деревни Урала. 700 км по реке к последним жителям

Умирающие деревни Урала. 700 км по реке к последним жителям

बालपणात घेऊन जाणारे

बालपणात घेऊन जाणारे "मामाचं घर" |Rustic Holidays Agro and Ecotourism

तळकोकणाचा अस्सल अनुभव देणारा माचली फार्मस्टे | कोकणातील ऑफबीट ठिकाण

तळकोकणाचा अस्सल अनुभव देणारा माचली फार्मस्टे | कोकणातील ऑफबीट ठिकाण

कोकणातील  स्वर्ग वालावल l Prabhusrushti Walaval | Unexplored Konkan Village | Sindhudurg Tourism

कोकणातील स्वर्ग वालावल l Prabhusrushti Walaval | Unexplored Konkan Village | Sindhudurg Tourism

ОГРОМНАЯ ЗАБРОШЕННАЯ ДЕРЕВНЯ КУЗНЕЦЫ. 100 БРОШЕННЫХ ДОМОВ В ЛЕСУ.  НАХОДКИ СТАРИНЫ. БОЛЬШОЙ ФИЛЬМ.

ОГРОМНАЯ ЗАБРОШЕННАЯ ДЕРЕВНЯ КУЗНЕЦЫ. 100 БРОШЕННЫХ ДОМОВ В ЛЕСУ. НАХОДКИ СТАРИНЫ. БОЛЬШОЙ ФИЛЬМ.

Что находится на 95% пустующей Австралии?

Что находится на 95% пустующей Австралии?

RADHANAGARI - Natural World Heritage Site in India |  EP01 | Wildlife Sanctuary | Radhangari Dam

RADHANAGARI - Natural World Heritage Site in India | EP01 | Wildlife Sanctuary | Radhangari Dam

First Houseboat In Konkan Maharashtra l Houseboat Stay In Guhagar Konkan | Konkan Houseboat stay

First Houseboat In Konkan Maharashtra l Houseboat Stay In Guhagar Konkan | Konkan Houseboat stay

Ep 7 Chiplun to Ganpatipule (Ratnagiri District)  Shri Parshuram Temple | Konkan Tour, Maharashtra

Ep 7 Chiplun to Ganpatipule (Ratnagiri District) Shri Parshuram Temple | Konkan Tour, Maharashtra

आमच्या कोकणातील गावात हे काय नवीन ?

आमच्या कोकणातील गावात हे काय नवीन ?

आचरा - कोकणातली सुंदर पर्यटनस्थळ

आचरा - कोकणातली सुंदर पर्यटनस्थळ

METHOD in MADNESS सगळ्या जगावर महायुद्ध लादणारा इराण वेडा नाही ! | Bhau Torsekar | Pratipaksha

METHOD in MADNESS सगळ्या जगावर महायुद्ध लादणारा इराण वेडा नाही ! | Bhau Torsekar | Pratipaksha

Unseen Kokan l Never Seen Before Kokan l Explore Konkan l Wayari l Tarkarli l Malvan Beaches l मालवण

Unseen Kokan l Never Seen Before Kokan l Explore Konkan l Wayari l Tarkarli l Malvan Beaches l मालवण

कोकणाचा अस्सल अनुभव देणारा 'बागायतदार फार्मस्टे' | Traditional Farmstay | Explore Local Culture

कोकणाचा अस्सल अनुभव देणारा 'बागायतदार फार्मस्टे' | Traditional Farmstay | Explore Local Culture

फणसाड अभयारण्य - मुरूड आणि रोहा PHANSAD WILDLIFE SANCTUARY #explorewithjaigurudev

फणसाड अभयारण्य - मुरूड आणि रोहा PHANSAD WILDLIFE SANCTUARY #explorewithjaigurudev

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]