पुर्वजांचे गाव सांदोशी | जिवाजी सर्कले | कावळ्या बावळ्या खिंड | कोकणदिवा | Marathi Vlog
Автор: Riders Of Dakkhan
Загружено: 2021-10-27
Просмотров: 2258
Описание:
#सांदोशी माझा गाव वसे काळनदीतीरी ।
थोर #ईतिहास याचा काय वर्णू त्याची थोरी ॥
गनिमांसी ठार केले कावले, घाटी खिंडीमाजि ।
धन्य #सर्कले नायक, धन्य #जगताप गोदाजी ॥
आमच्या पुर्वजांच्या पराक्रमाचा दुर्लक्षित व ज्वलंत इतिहास जागृत करण्यासाठी व दुर्लक्षित वीरांना अभिवादन करण्यासाठी आज आमच्या बिबवेवाडी येथील (सर्कले) सरकाळे घराण्याने कावळ्या बावळ्या खिंड मोहिम योजित केली होती. आपल्या पुर्वजांचा ईतिहास समजावा आणि इतिहासाचा वारसा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमित व्हावा हा उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली होती. सर्व प्रथम पाचाड येथे जिजाऊ मासाहेबांचे दर्शन घेऊन आणि रायगड ला माथा टेकवुन आम्ही सांदोशी गाव गाठले.
आज सांदोशी गावात अनेक सर्कले कुटुंबीयांची घरे आहे फेसबुक वरील आमचे बंधु कृणाल सर्कले यांचे वडील रामचंद्र सर्कले यानी आम्हाला संपुर्ण गावाबद्दल तसेच तसेच खिंडी मध्ये घडलेल्या ईतिहासाबद्दल अपरिचित अशी माहीती सांगितली त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी कावळ्या बावळ्या खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावात काही अज्ञात वीरांच्या विरगळी अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्या होत्या ताचे गावातील लोकांनी केलेले संवर्धन तसेच या खिंडीत लढल्या गेलेल्या वीरांच्या म्हणजेच जीवाजी सर्कले नाईक आणि त्यांच्या ९ मावळ्यांचा ईतिहास आम्हाला सविस्तर सांगितला व गावातील अनेक हेमाडपंती देवदेवतांच्या मुर्ती ग्रामदेवता तसेच स्वताकडील शस्त्रे आम्हाला दाखवली आणि मायेने आमची विचारपुस करुन आमचा पाहुणचार केला.
#ईतिहास-
घोडखिंड ,उंबरखिंड ,नेसरीची खिंड अशा कितीतरी खिंडी पराक्रमाने पावन झाल्या आहेत. त्यापैकीच एक "कावळा बावळा खिंड" एक छोटीशीच लढाई पण ती नसती झाली तर आज इतिहास वेगळा असता. कावळ्या बावळ्या खिंडीचा रणसंग्राम पानशेतहून सह्याद्रीची कोकणादिवा कडून सांदोशी मार्फत रायगडला जाणारी वाट कावल्या-बावल्या खिंडीतुन जाते. या घाटवाटेला कावळ्या घाट असेही म्हणतात. औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला शंभुराजांना ठार मारले. त्यानंतर लगेचऔरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. याच वेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले. जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी शहाबुद्धीन खान हा सरदार पानशेतहुन कावल्या-बावल्याच्या खिंडीतून रायगडकडे निघाला. त्या मोगली सरदाराची खबर सांदोशी गावातले गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक यांना लागली. त्यांनी आपल्या नऊ साथीदारांसह शहाबुद्धीन खानास कावल्या-बावल्या खिंडित गाठले आणि त्याचे खुप सैन्य कापून काढले. उरलेले सैन घेऊन शहाबुद्धीन औरंगजेबाकडे पळला. परिणामी राजाराम महाराज कड्यावरून सुरक्षित वाटेने सुटले. आणि स्वराज्य अस्मियतेची लढत कायम राहीली.
Krunal Sarkale (Sandoshi Gav)
9359133489
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: