12 वी | पर्यावरण व जलसूरक्षा | सेमिनार क्रमांक -7 |शाश्वत विकासाची ध्येय by Devane V.G SMJr.College
Автор: vishwambhar devane
Загружено: 2022-01-02
Просмотров: 1866
Описание:
सेमिनार अहवाल क्रमांक 7
मुख्य घटक : शाश्वत विकास
उपघटक : शाश्वत विकासाची ध्येय
प्रस्तावना
आपण पर्यटनाला जाऊन आनंद घेतो. आपल्या करमणुकीसाठी आपण जंगल, पर्वत, नद्या, समुद्र तसेच वन्य जीव असलेल्या ठिकाणी जातो कारण, निसर्गाच्या सानिध्यात आपणास खूप आनंद घेता येतो. पण आपल्या पुढील पिढ्यांचे काय ? तेदेखील असेच निसर्गाचा आनंद घेऊ शकतील का ? पुढच्या पिढ्यांना देखील आनंद मिळाला पाहिजे असे आपणास वाटत असेल तर आपण प्रदूषणापासून आपल्या वसुंधरेचे रक्षण केले पाहिजे. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे पण आपली हाव पूर्ण करता येईल येवढे दिले नाही. याचा विचार करून आपण शाश्वत विकास केला पाहिजे.
शाश्वत विकास म्हणजे असा विकास आहे की, जो सध्याच्या पिढीतील गरजा भागवतांना निसर्गाचा ठेवा भावी पिढीसाठी देखील ठेवला पाहिजे. भावी पिढ्यांच्या सर्व गरजा निसर्गाकडून पूर्ण व्हाव्यात त्यांच्यात समतोल साधला जावा हेच शाश्वत विकासाचे ध्येय आहे. म्हणून शाश्वत विकासाची ध्येये कोणती आहेत ? याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही 'शाश्वत विकासाची ध्येय' हा सेमिनारसाठी विषय निवडला आहे.
सादरीकरण
सर्वांना चांगले भविष्य लाभावे यासाठी 2015 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत खालील 17 ध्येय निश्चित केली आहेत. ती सर्व ध्येय आमच्या गटाने चित्रांचा, पोस्टरचा वापर करून सादर केली आहेत. त्यात खालील ध्येयांचा समावेश होतो.
1) गरिबी निर्मूलन
2) भूक मिटविणे
3) आरोग्यपूर्ण जीवन
4) गुणवत्तापूर्ण शिक्षण
5) स्वच्छ पाणी
6) आर्थिक वृद्धी व चांगला रोजगार
7) विषमता दूर करणे
8) जबाबदार उपभोग
9) महासागराचे संवर्धन
10) लिंग समानता
11) आधुनिक ऊर्जा साधने
12) पायाभूत सुविधांची निर्मिती 13) शाश्वत शहरे व मानवी वस्त्या
14) हवामान बदल
15) भूपृष्ठीय जीवन
16) न्याय व शांतता
17) शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी.
आमच्या गटातील आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाश्वत विकासाच्या ध्येयांचे सादरीकरण केले.
याशिवाय मी, इतर गटातील सेमिनार मध्ये सहभाग नोंदवला त्यात खालील विषयांचा समावेश होता.
1) लोकसंख्या वाढ
2) वाढते तापमान
3) ध्वनि प्रदूषण
4) जल प्रदूषण
5) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन
विद्यार्थ्याचे नाव............ परीक्षा क्रमांक ..................
वर्ग .....तुकडी.... शाखा.......
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: