सा रे ग म प विजेते सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर l
Автор: Real Treasure - Temples and rituals
Загружено: 2025-08-15
Просмотров: 355
Описание:
नवी मुंबई महानगरपालिका यांनी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ( ७५०) जयंती वर्ष निमित्त सा रे ग म प विजेते सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर यांचा भक्तीरंग हा अभंग व भक्ती गीतांचा कार्यक्रम दिनांक १५/०८/२०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील ॲम्फीथिएटर येथे आयोजित केला होता.
‘भक्तिरंग’ स्वरयात्रेतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना नवी मुंबई महापालिका मुख्यालयात स्वरमयी अभिवादन
गोकुळअष्टमी या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा जयंतीदिनाचे औचित्य साधून सन 2025 ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (750) जयंती वर्षानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये ‘भक्तिरंग’ या अभंग व भक्तीगीत गानसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रसिध्द गायक श्री.मंगेश बोरगांवकर यांनी आपल्या सहका-यांसह सादर केलेल्या भक्तिरंगाच्या नामगजरात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित रसिक नागरिक अगदी तल्लीन झाले. जणू महापालिका मुख्यालयातच पंढरी व आळंदी अवतरल्याचा भास व्हावा इतके अभंग, ओव्यांनी वातावरण सुरेल झाले होते.
राज्य शासनाच्या सूचनांनुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून दिंडीसोबतच भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेने केले असल्याचे सांगत त्याला नवी मुंबईकर नागरिकांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली असून तिचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करतानाच आयुक्तांनी सर्व समाजाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले महनीय कार्य व ओव्या – अभंगातून दिलेले संदेश याचे पालन आपल्याच आत्मिक विकासासाठी करण्याकरिता आपण कटीबध्द राहिले पाहीजे असे विवेचन केले. आज स्वातंत्र्यदिन, गोकुळअष्टमी आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा जयंतीदिन असा त्रिवेणी योग असल्याचा विशेष उल्लेखही त्यांनी केला.
‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामगजराने आपल्या स्वरसंध्येचा प्रारंभ करीत गायक श्री.मंगेश बोरगावकर यांनी अनेक गाण्यांमध्ये रसिकांकडूनही गाऊन घेत त्यांना सहभागी करून घेतले. त्यामुळे जणू सारे सभागृहच एक रंगमंच झाले होते. ज्ञानेश्वरीतील आरंभीच्या ‘ओम नमोजी आद्या’ पासून श्रीगणेशाला वंदन करीत अखेरच्या पसायदानापर्यंत उपस्थित सर्व रसिक भक्तिस्वरनादात रंगून गेले होते. गायिका श्रीम.श्रावणी वागळे यांनीही सुमधूर अभंग, भक्तीगीते सादर करीत स्वररंग भरला. श्री.अमेय बाळ यांनी संत ज्ञानेश्वरांची महती सांगत प्रत्येक गीताचे उत्तम निरूपण केले. श्री.ओंकार अग्निहोत्री (संवादिनी), श्री.संदीप पवार (तबला), श्री.वैष्णव चव्हाण (पकवाज), श्री.अमोल तळेकर (ऑक्टोपॅड), श्री.आदित्य गोगटे (बासरी) या वादकांनी सुंदर साथ करीत कार्यक्रमाची उंची वाढविली. पत्रकार श्री.मनोज जालनावाला यांनी सादर केलेल्या ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई’ अभंगालाही रसिकांनी दाद दिली.
विशेष म्हणजे भक्तिरंग ही स्वरयात्रा सुरू असताना रंगमंचाच्या एका कोप-यात चित्रकार श्री. सागर जाधव यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे पोट्रेट चितारले. हे अप्रतिम पोट्रेट चित्रकार सागर जाधव यांनी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांना भेट दिले. याप्रसंगी श्रीम.रेवती कैलास शिंदे यांचीही विशेष उपस्थिती होती.
व्यासपीठावर आयुक्त महोदय तसेच अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, समाजविकास उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम. स्मिता काळे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, क्रीडा व सांस्कृतिक विभाग उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत भक्तिरंगमधील कलावंतांचा सन्मान करण्यात आला.
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporationon #navimumbaimahanagarpalika
#DGIPR
#nmmccommissioner
#drkailasshinde #kailasshindeias #shridyneshwarmaharajjayanti #750jayanti
#BhaktiRang
#mangeshborgaonkar
#realtreasure #realtreasuretemplesandrituals
#bhajan
#bhajancollection #hindudevotionalsong #hindudevotionalmusic
#भजन
#abhanga
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: