२७ वर्षांचा संसार. दोन पूरूषां बरोबर विवाहबाह्य संबंध. दोन मोठी मुले. GPS. What’s app. नवे निकाल
Автор: Rahul Kulkarni Official
Загружено: 2026-01-24
Просмотров: 69823
Описание:
पन्नाशी ओलांडलेल्या दांपत्याचा घटस्फोट
क्रौर्याच्या आधारावर न्यायालयाकडून पतीला दिलासा
लग्नानंतर काही वर्षांनी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सहन कराव्या लागलेल्या पतीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. पन्नाशी ओलांडलेल्या दांपत्यांचा घटस्फोट पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला असून, त्यांच्या १७ वर्षीय मुलीचा कायमस्वरूपी ताबा आईकडेच राहील, असे निकालात नमूद केले.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासह दोन्ही मुलांचा ताबा मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने क्रौर्याच्या आधारावर हा घटस्फोट मंजूर केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुरेश (वय ५३) आणि सुरेखा
न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणे
मुलगा सज्ञान असल्याने त्याच्या ताब्याचा प्रश्न उद्भवत नाही
मुलीचे भवितव्य आईसोबत राहण्यातच सुरक्षित
मुलांच्या ताब्याबाबत 'बालकाचे कल्याण' हे तत्त्व केंद्रस्थानी
क्रौर्याच्या आधारावर घटस्फोट मिळण्यास पती पात्र
नताशा (वय ५१) (नावे बदललेली) यांचा २९ डिसेंबर १९९६ ला विवाह झाला होता. या दांपत्याला एक मुलगा, एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी पत्नीच्या वर्तनामुळे शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप पतीने केला होता, तसेच पत्नीने स्वतःला इजा करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या दाव्यात नमूद आहे. पत्नीने दिलेल्या त्रासामुळे आपल्याला
क्रौर्याच्या आधारावर घटस्फोट मिळावा, तसेच दोन्ही मुलांचा ताबा स्वतःकडे असावा, असा दावा अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत केला होता.
दोन्ही मुलांच्या ताब्याची मागणी फेटाळली
मुलगा हा २५ वर्षांचा असून, तो सज्ञान असल्याने त्याच्या ताब्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले, तर मुलगी ही दहावी उत्तीर्ण असून १७ वर्षांची
न्यायालयाने क्रौर्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर करून पतीला न्याय दिला आहे. मुलांच्या ताब्याबाबत 'बालकाचे कल्याण' हे तत्त्व केंद्रस्थानी ठेवून निर्णय देण्यात आला आहे. शारीरिक आणि मानसिक त्रासातून पतीची सुटका झाली, याचे समाधान आहे.
आहे. 'बालकाचे कल्याण' या तत्त्वाचा विचार करता, तरुण मुलीचे भवितव्य आईसोबत राहण्यातच सुरक्षित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे मुलीचा कायमस्वरूपी ताबा आईकडेच देण्यात आला असून, पतीची दोन्ही मुलांचा ताबा मागण्याची मागणी फेटाळण्यात आली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: