#पुण्यवंत
Автор: Narayan Khillari
Загружено: 2022-09-05
Просмотров: 1905
Описание:
ह भ प नारायण महाराज खिल्लारी गुरूजी व ह भ प विनोद महाराज शिंदे यांच्या आवाजातून कीर्तन चाल..
पखवाज साथ. ह भ प ओमकार महाराज रायते...
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि ।
कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी ।
चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली ।
वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकुळा लावियेली ।
यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली ॥३॥
सत्त्ववानाचा बहु केला छळ ।
कीर्तिवानाचें मारियेलें बाळ ।
सखा म्हणविसी त्याचें नासी बळ ।
जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: