पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी १० लाख लाडू प्रसादाची तयारी सुरू | Pandharpur News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-30
Просмотров: 529
Описание:
पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी १० लाख लाडू प्रसादाची तयारी सुरू | Pandharpur News
पंढरपूरमध्ये येत्या दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेचा महासोहळा साजरा होणार आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांना अल्प दरात चांगला आणि स्वच्छ लाडू प्रसाद मिळावा यासाठी मंदिर समितीकडून जोरदार तयारी सुरू आहे. यंदाच्या वारीसाठी जवळपास दहा लाख लाडू तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मंदिर समितीकडून पौष्टिक आणि शुद्ध लाडू प्रसाद तयार करण्यात येत आहे, ज्यात काजू, बदाम यांसारख्या सुक्या मेव्याचा वापर केला जातो. हे लाडू शुद्ध तेलात तयार केले जातात. लाडू तयार करण्यासाठी साठ ते सत्तर महिला आणि पुरुष कर्मचारी कार्यरत आहेत. एका पाकिटात दोन लाडू पॅक करून वीस रुपये अल्प दरात विक्री केली जाते. यातून मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. लाडू तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 'आम्हाला खूप आनंद मिळतोय' असे म्हटले. या निमित्ताने प्रसादामध्ये गोडवा निर्माण होत आहे.
#Pandharpur #KartikiYatra #VitthalRukmini #LadduPrasad #Devotees #Maharashtra #TempleCommittee #ReligiousFestival #Pilgrimage #IndianCulture #HinduFestival #Sweets #Prasad #November2 #Workers #Devotion #Spiritual #Fair #SaamTV
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: