Ambernath Shiv Temple History | Ambernath Shiv Mandir I अंबरनाथ शिवमंदिर इतिहास |
Автор: Siddhshabd
Загружено: 2025-01-01
Просмотров: 457
Описание:
मंदिरांची मुंबई सीरिजच्या एक्कावन्नाव्या आणि शेवटच्या भागात आपण अंबरनाथ शिव मंदिराचा खरा इतिहास पाहणार आहोत. भूमिज पद्धतीचं हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं मंदिर असावं. या मंदिरावरील सर्वच शिल्पांची माहिती मलाच अभ्यासता आली नाही परंतु काही प्रमुख शिल्प कथा मी प्रत्यक्षात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अंबरनाथ शिव मंदिर हे पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं मंदिर नाही आणि हे हजारो वर्ष जुनं देखील नाही. उत्तर कोकणातील शिलाहार राजा छित्तराज यानं इसवी सन १०२४ साली हे मंदिर बांधायला सुरुवात केली असावी. तर याचा कलशरोपण सोहळा शक सवंत ९८२ श्रावण शुद्ध नवमी शुक्रे अर्थात इसवी सन १०६० मध्ये शिलाहार राजा मुम्मुणी यांनी केला. या अर्थाचा शिलालेख मंदिरात सापडला होता. त्यानुसार या मंदिरातील देवतेचे नाव आम्रनाथ आहे. ज्याचा अपभ्रंश होऊन अंबरनाथ झालं.
मंदिरावर असलेल्या हजारो शिल्पांची मांडणी अगदी विचारपूर्वक करण्यात आली आहे. यावर भगवान शंकराच्या विविध रूपांसह ब्रह्म, विष्णू, अष्टदिक्पाल आणि देवीच्या मूर्ती आहेत. इथे महाकाली, गजान्तक, अंधकान्तक, त्रिपुरान्तक इत्यादी अनेक प्रसंग देखील दाखवण्यात आले आहेत. हे मंदिर व्हिडीओ मधून पाहण्याचा नव्हे तर प्रत्यक्षात जाऊन अनुभवण्याचा विषय आहे, म्हणूनच मंदिराच्या मुंबई सीरिजच्या शेवटच्या भागासाठी प्रेक्षकांना मी इथे बोलावलं होतं. नेहमीप्रमाणे एकच सांगेन, भारतीय शिल्पकलेचे हे रत्न अनुभवायला एकदा नक्की जा.
मंदिरांची मुंबई ही सीरिज मुंबई आणि नजीकच्या परिसरातील जुनी आणि वेगळी मंदिरे दाखवण्यासाठी मी सुरू करण्यात आली होती. मला ही सीरिज करताना खूप काही शिकायला मिळालं. वर्षभर सातत्य राखणं थोडं कठीण होतं, परंतु प्रत्यक्ष शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता न चुकता एक मंदिर दाखवता आलं याचं मला समाधान आहे.
In this video, we dive deep into the rich history of this ancient temple, showcasing the intricate stories behind its stunning statues and sculptures. From fascinating legends to historical facts, explore the heritage of this architectural marvel that has stood the test of time.
In this video:
The real history and significance of Ambernath Shiv Temple
Intriguing stories behind the temple's statues and carvings
Architectural highlights and unique features of the temple
Historical events and cultural traditions associated with the temple
Don't forget to:
Like this video if you enjoyed the content
Subscribe to my channel for more such videos
Share this video with friends and family to spread the knowledge
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: